आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरती:उत्तर-मध्य झोन कल्चरल केंद्रात विविध 15 पदांची भरती; अर्जासाठी 30 दिवस मुदत

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयांतर्गत येणारी आॅटोनाम्स बाॅडी असलेल्या प्रयागराजमधील उत्तर-मध्य झोन कल्चरल केंद्रात विविध १५ पदांची मोठी भरती केली जाणार आहे. काही पदे कंत्राटावर तर काही डेप्युटेशनने भरली जाणार आहे. त्यासाठी ८ डिसेंबरला या केंद्राच्या वतीने जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली असून, पुढील ३० दिवसांत इच्छुकांनी अर्ज करावे, असे केंद्राच्या संचालकांनी जाहीर केले आहे.

यात डेप्युटी डायरेक्टर (प्रोग्राम), डेप्युटी डायरेक्टर (अॅडमिनिस्ट्रेशन अॅण्ड अकाउंट्स), असिस्टंट डायरेक्टर (प्रोग्राम), असिस्टंट डायरेक्टर (अॅडमिनिस्ट्रेशन अॅण्ड अकाउंट्स), अॅडमिनिस्ट्रेटिव्ह कम अकाउंट्स आॅफिसर, डाॅक्युमेंटेशन आॅफिसर, असिस्टंट इंजिनिअर (इलेक्ट्रिकल), प्रोग्राम एक्झिक्युटिव्ह, असिस्टंट, ज्युनिअर हिंदी ट्रान्सलेटर, असिस्टंट प्रोग्राम एक्झिक्युटिव्ह, एक्झिबिशन असिस्टंट, ज्युनिअर असिस्टंट, स्टेनोग्राफर ग्रेड-१ या पदांचा समावेश आहे.

याबाबत अधिक माहिती आणि अर्जाची प्रक्रियेसह इतर बाबींसाठी http://www.nczcc.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी. अर्ज डाऊनलोड करावा. पूर्ण भरून योग्य पुराव्यासह संचालक एनसीझेडसीसी १४, सीएसपी सिंग मार्ग, प्रयागराज - २११००१ या पत्त्यावर पुढील ३० दिवसांत सादर करावा.

बातम्या आणखी आहेत...