आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारहाण:टवाळखोरांची ज्येष्ठ नागरिकाला मारहाण

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहर व परिसरात गुन्हेगारी घटनांचे प्रमाण वाढत असतानाच पाेलिसांकडून कुठलीही ठाेस पावले उचलली जात नसल्याने टवाळखोरांची दहशत वाढतच असल्याचा प्रत्यय पुन्हा साेमवारी (दि. ३१) रात्रीच्या सुमारास इंदिरानगर बाेगद्याजवळ आला.

या ठिकाणी कट लागल्याचे कारण काढून टाेळक्याने कारमधील एका ज्येष्ठ नागरिकाला कारबाहेर काढून बेदम मारहाण केली तसेच कारच्या काचा फोडल्या. तब्बल तासभर या भागात दहशत निर्माण करत टाेळक्याने रिक्षातून पळ काढला. मात्र, तरीही समाेरच असलेले वाहतूक पाेलिस आले नाहीत तसेच इंदिरानगर पाेलिसही आले नाहीत. शेवटी इतर वाहनधारकांनीच ज्येष्ठ नागरिकाला गाडीत बसवत घरी पाठविले.

बातम्या आणखी आहेत...