आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवेशप्रक्रिया:अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी 18 हजार विद्यार्थ्यांची नोंदणी

नाशिक3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दहावीच्या परीक्षेचा ऑनलाइन पद्धतीने निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी आतापर्यंत १८ हजार १८७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. अकरावी प्रवेशाचे सविस्तर वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही. सीबीएसइ व आयसीएसइ बोर्डाच्या दहावीच्या परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. पुढील आठवडाभरात निकाल जाहीर होण्याची शक्यता असून जुलैमध्ये अकरावीची ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया होऊ शकेल.

अकरावी प्रवेशासाठी यंदाही केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने प्रक्रिया राबविली जाणार आहे. नाशिकसह राज्यभरातील प्रमुख शहरांतील कनिष्ठ महाविद्यालयांत या ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेद्वारे विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार आहे. दहावीचा निकालापूर्वी ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेंतर्गत अर्जाचा भाग एक भरण्याची सुविधा ३० मेपासून सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत १८ हजार १८७ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. नाशिक शहरात ६० कनिष्ठ महाविद्यालये असून त्यात कला, वाणिज्य, विज्ञान व संयुक्त शाखा मिळून सुमारे २५ हजार जागा उपलब्ध आहेत. नाशिकसह राज्यातील मुंबई, पुणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, अमरावती, नागपूर या महापालिका क्षेत्रांत ऑनलाइन पद्धतीने प्रवेशप्रक्रिया होईल. तर ग्रामीण भागात तसेच इतर शहरांमध्ये ऑफलाइन पद्धतीने प्रवेशप्रक्रिया होईल. ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रॅक्ट्रिस व्हावी यासाठी २३ ते २७ मेदरम्यान ‘मॉक डेमो रजिस्ट्रेशन’ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. प्रवेश अर्ज कसा भरावा, अर्ज भरताना कोणही माहिती आवश्यक आहे याची माहिती विद्यार्थ्यांना या सुविधेमुळे मिळाली.

३० मेपासून https://11thadmission.org.in या संकेतस्थळावर प्रवेश अर्जाचा भाग एक भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये वैयक्तिक माहितीसह इतर माहिती भरणे अनिवार्य असेल. अर्ज प्रमाणित करून घेता येणार आहेत. त्याशिवाय आयडी व पासवर्ड वापरून लॉगीन करता येतील. ऑनलाइन शुल्क भरून फॉर्म लॉक करणे आणि अर्ज प्रमाणित करण्यासाठी मार्गदर्शन केंद्र निवडणे, अशा सुविधादेखील उपलब्ध होणार आहेत. माध्यमिक शाळा आणि मार्गदर्शक केंद्रांनी विद्यार्थ्यांनी भरलेले प्रवेश अर्ज भाग एकमधील माहिती तपासून प्रमाणित करणे अनिवार्य आहे

बातम्या आणखी आहेत...