आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

188 युवकांना मार्गदर्शन:सादरीकरण करण्यासाठी  50 विद्यार्थ्यांची नोंदणी

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेने दुसऱ्या दिवशी तीन तालुक्यांमध्ये हजेरी लावत तेथील १८८ युवकांना नवसंकल्पनांबाबत मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे यातील ५० विद्यार्थ्यांनी स्टार्टअपसंदर्भातील आपल्या संकल्पनांचे सादरीकरण करण्यासाठी नोंदणी केली आहे.

सोमवारी बागलाण तालुक्यातील युवकांमध्ये जनजागृती केल्यानंतर मंगळवारी यात्रा देवळा तालुक्यातील एनसीव्हीटी सप्तशंृगी शिक्षण संस्थेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत पोहाेचली. तेथून दौलतनगरच्या केआरए महाविद्यालय, बसस्थानकात पोहाेचली. कळवण तालुक्यातील शासकीय आयटीआय (आदिवासी), मु. कोल्हापूर फाटा आणि एसपी पब्लिक स्कूल, आरकेएम इंग्लिश स्कूल, पंचायत समिती कार्यालय, लाडशाखीय वाणी समाज मंगल कार्यालय येथे यात्रेद्वारे माहिती देण्यात आली.

यावेळी युवकांनी याबाबतच्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नोंदणी केली. जिल्हा आणि पुढे निवड झाल्यास राज्यस्तरावर सादरीकरणाची संधी मिळेल असे आयोजकांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...