आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडीसाठी चुरस‎:राेहीत जगताप यांची भिमाेत्सवाच्या‎ अध्यक्षपदी चिठ्ठी पध्दतीने निवड‎

नाशिक‎13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वारबाबानगर येथे साजरा करण्यात येणाऱ्या‎ भिमाेत्सवाच्या अध्यक्षपदासाठी २५ जण इच्छुक‎ हाेते. चर्चेअंती २० जणांनी माघार घेतली‎ असली तरी उर्वरीत पाच इच्छुक माघार घेण्यास‎ तयार नसल्याने चिठ्ठी पध्दीतीने अध्यक्षपदाची‎ निवड करण्यात आली. अध्यक्षपदासाठी राेहीत‎ बाळासाहेब जगताप यांच्या नावाची चिठ्ठी‎ निघाल्याने त्यांचे नाव घाेषित करण्यात आले.‎ ‎ सातपूरच्या स्वारबाबानगर येथे रिपाइंचे‎ जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रकाश लाेंढे‎ यांच्या मार्गदर्शनाखाली व दीपक लाेंढे यांच्या‎ अध्यक्षतेखाली भिमाेत्सवाच्या अध्यक्षपदाची‎ निवड करण्यासाठी बैठक घेण्यात आली. या‎ महाेत्सवाच्या अध्यक्षपदी यापूर्वी ब्राम्हण,‎ मातंग, ख्रिश्चन अशा विविध जाती धर्माच्या‎ युवकांची निवड करण्यात आली.

यंदा झालेल्या‎ बैठकीत मात्र इच्छुकांची संख्या अधिक‎ असल्याने बराच वेळ नाव निश्चिती हाेत‎ नव्हती. त्यामुळे चिठ्ठी पध्दतीचा अवलंब करून‎ अध्यक्षपदाची निवड करण्यात आली. बैठकीस‎ माजी सातपूर प्रभाग सभापती उषा शेळके,‎ माजी नगरसेविका दीक्षा लाेंढे, हर्षा फिराेदीया,‎ शितल भामरे, किशाेर मुंदडा आदींसह रिपाइंचे‎ कार्यकर्ते व पदाधिकारी माेठ्या संख्येने‎ उपस्थित हाेते. भिमाेत्सवाच्या निमित्ताने‎ स्वारबाबानगर येथे महानाट्याचे आयाेजन‎ करण्यात आले आहे. तसेच सातपूर‎ विभागातील कामगार नगर, महादेववाडी,‎ कांबळेवाडी, संताेषीमातानगर, चुंचाळे,‎ शिवाजीनगर, अंबड लिंकराेड, अशा विविध‎ भागातील नागरीकांसाठी त्या त्या ठिकाणी‎ कार्यक्रमांचे आयाेजन करण्यात आल्याची‎ माहिती रिपाइंचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लाेंढे यांनी‎ दिली.‎

बातम्या आणखी आहेत...