आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अटकेची मागणी‎:मृताच्या नातेवाइकांचा पाेलिसांना घेराव‎

नाशिकरोड‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी‎ संशयित खासगी सावकारास अटक‎ करा, अशी मागणी करत आत्महत्या ‎केलेल्या रवींद्रनाथ कांबळे यांच्या ‎नातेवाइकांनी उपनगर पाेलिस ठाण्यात ‎साेमवारी (दि. ६) पाेलिस‎ अधिकाऱ्यांना घेराव घातला. कारवाई ‎हाेईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा‎ पवित्रा नातेवाइकांनी घेतला हाेताे.‎ पाेलिस निरीक्षक नीलेश माईनकर‎ यांनी नातेवाइकांची समजूत‎ घातल्यानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार ‎ करण्यात आले.

यानंतर संशियाचा‎ शाेध घेण्यासाठी पथक रवाना झाले.‎ सावकाराच्या जाचाने आत्महत्या‎ केल्याप्रकरणी उपनगर पोलिसात‎ रघुनाथ लक्ष्मण कांबळे यांनी फिर्याद‎ दिली असून त्यानुसार उपनगर‎ पोलिसांनी संशयित सावकार रत्नाकर‎ लक्ष्मण भोर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल‎‎ केला आहे. संशयिताच्या अटकेची‎ मागणी करत मृताच्या नातेवाइकांनी‎ केली हाेती.‎

बातम्या आणखी आहेत...