आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारिलायन्स इंडस्ट्रीची उपकंपनी असलेल्या रिलायन्स लाइफ सायन्सेस प्रा. लि. या कंपनीने दिंडोरी एमआयडीसी क्षेत्रातील तळेगाव-अक्राळे येथे आपल्या विस्तार प्रक्रियेला सुरुवात केली आहे. यापुर्वी 2500 काेटी रूपयांची गुंतवणूक करण्याचे कंपनीने नियाेजित केले हाेते, आता हीच गुंतवणूक 4200 काेटी रूपयांपर्यंत कंपनी वाढवणार आहे. यामुळे सहाजिकच राेजगार निर्मीतीत वाढ हाेणार असून या औद्याेगिक वसाहतीत इतर उद्याेगही आकर्षित हाेऊ शकणार आहे.
राज्यातील मराठवाडा, नाशिक, विदर्भ, पुणे या विभागातील औद्याेगिक विकासाला चालना देण्यासाठी मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उद्याेग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितिच्या चाैथ्या बैठकीत 70 हजार काेटींच्या गुंतवणूक प्रकल्पांना मान्यता देण्यात आली, त्यात ह्या कंपनीच्या 4200 काेटी रूपयांच्या गुंतवणूकीला मान्यता देण्यात आली आहे. यापुर्वी कंपनीने सूरूवातीला 1 हजार काेटी त्यानंतर 2500 काेटीपर्यंत गुंतवणूकीचा विस्तार केला हाेता. आता हीच गुंतवणूक 4200 काेटीपर्यंत विस्तारली जाणार आहे.
तीन-साडेतीन हजार थेट राेजगार
कंपनीने या नव औद्याेगिक वसाहतीत एमआयडीसीकडून तळेगाव-अक्राळे येथील १६१ एकर जागेत प्लाझ्मा प्रोटिन्स यासह आयात करावी लागणारी विविध औषधे व लसनिर्मिती व संशाेधन अन् विकास ही कामे केली जाणार आहे. त्याकरिता ही गुंतवणूक केली जाणार असून, यातून तीन ते साडेतीन हजार प्रत्यक्ष तर सात-साडेसात हजार अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे.
नाशिकच्या विकासासाठी सुखद बाब
रिलायन्स सायन्सेस प्रा. लि. ही कंपनी सध्या नवी मुंबईत २५ एकर जागेवर उभी आहे. आता नाशिकमधील तळेगाव अक्राळे येथे तब्बल १६१ जागेवर कंपनीचा विस्तार होणार असून, नाशिककच्या विकासासाठी ही एक सुखद बाबच म्हणावी लागेल. यामुळे फार्माच नाही तर इतरही क्षेत्रातील नवी औद्याेगिक गुंतवणूक नाशिकमध्ये आकर्षित हाेऊ शकणार आहे.
कंपनीची गुंतवणूक आता 4200 काेटींची
''रिलायन्स लाइफ सायन्सेस प्रा.लि. हया कंपनीने यापुर्वी 2500 काेटी रूपयांची गुंतवणूक येथे केली आहे, आता हीच गुंतवणूक 4200 काेटींपर्यंत नेण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.'' -
नितीन गवळी, प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.