आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलासा:आर्थिक खडखडाटात महापालिकेला मुद्रांक अधिभाराचा दिलासा; सव्वाआठ कोटींचा निधी

नाशिक21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक असताना राज्य शासनाने एक टक्का मुद्रांक अधिभारापोटी २०२२-२३ या वर्षाकरिता महापालिकांना दिल्या जाणाऱ्या अनुदानाचा पहिला टप्पा वितरीत केला असून त्यातून नाशिक महापालिकेला ८.३१ कोटी रुपये मिळाले आहेत. त्यामुळे जवळपास २८०० कोटी रुपयांच्या दायित्व फिटण्यास मदत होणार आहे.

कोरोनामुळे महापालिकेच्या घरपट्टी व पाणीपट्टी उत्पन्नात घट झाली असून दोन्ही मिळून जवळपास तीनशे कोटी रुपयांची थकबाकी वसूल करणे अपेक्षित आहे. पालिकेचे आयुक्त चा प्रशासक रमेश पवार यांनी थकबाकी वसुलीसाठी सर्व विभागांना अल्टिमेटम दिला असून त्याचाच एक भाग म्हणून अधिकारी व कर्मचारी जास्तीत जास्त थकबाकी वसुली करताना दिसत आहे. नगररचना विभागामध्ये देखील ऑनलाइन बांधकाम परवानगीमुळे येत असलेल्या अडचणी लक्षात घेत जूनपर्यंत ऑफलाइन फाइल मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न सुरू असताना मुद्रांक शुल्क अधिकार प्राप्त झाल्यामुळे पालिकेला दिलासा मिळाला आहे. महापालिकेला प्रथम जकात व त्यानंतर एलबीटी अनुदानातून मोठ्या प्रमाणामध्ये महसूल मिळत होता. त्यानंतर जीएसटी लागू झाल्यानंतर या अनुदानातून महापालिकांना निधी दिला जाऊ लागला.

दरम्यान, जीएसटी अनुदानाबरोबरच एक टक्का मुद्रांक अधिभारापोटी जमा होणारी रक्कमही महापालिकांना देण्याचा निर्णय घेतला गेला. २०२२-२३ या आर्थिक वर्षाकरिता नाशिकसह राज्यातील २६ महापालिकांसाठी राज्य शासनाने एक टक्का मुद्रांक अधिभारापोटी जमा होणाऱ्या रकमेचा तब्बल १४७ कोटींचा पहिला हप्ता वितरीत केला आहे. त्यात नाशिक महापालिकेच्या पदरात ८ कोटी ३१ लाख ८०,४०३ रुपये पडले आहेत.

बातम्या आणखी आहेत...