आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनाेखा उपक्रम:एकता तर्फे ११ जोडप्यांचा पुनर्विवाह

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

म्हसरूळच्या प्रभातनगर येथील एकता ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या सहाव्या वर्धापनदिनानिमित्त मंडळातील ज्या सभासदांच्या विवाहास ५० वर्षे पूर्ण झालीत अशा ११ जोडप्यांचा पुनर्विवाह लावण्यात येऊन अनाेखा उपक्रम राबवला.

मंडळाचे अध्यक्ष प्रतापराव वाढणे व अहिल्याबाई प्रतापराव वाढणे यांच्यासह धाडगे, चंदणे, बनकर, सूर्यवंशी, खांडेकर, अहिरे, कुलकर्णी, परमार, चव्हाण व गवारे या जोडप्यांचा विवाह लावण्यात आला. विवाहित जोडप्याचा यथोचित सत्कार करण्यात आला. त्यात वरास उपरणे, गुलाबपुष्प व वधूस ओटी व गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनांचे पुस्तक व सन्मानपत्र देण्यात आले. विवाहाप्रसंगी मंडळाच्या वतीने सुग्रास भोजनदेखील ठेवण्यात आले होते. अशा या अगळ्यावेगळ्या सोहळ्याने प्रत्येक सभासदांच्या चेहऱ्यावर समाधान व आनंद दिसत होता.

बातम्या आणखी आहेत...