आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक एकता मंडळाचा स्तुत्य उपक्रम:विवाहाची 50 वर्ष पूर्ण करणाऱ्यांचा केला पुनर्विवाह; 11 जोडप्यांचे लावले लग्न

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकता ज्येष्ठ नागरिक मंडळ, प्रभातनगर, म्हसरूळ येथील मंडळाच्या सहाव्या वर्धापनदिनानिमित्त एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला. मंडळातील ज्या सभासदांच्या लग्नाला 50 वर्ष पूर्ण झालीत अशा 11 जोडप्यांचा पुनर्विवाह करण्यात आला.

11 जोडप्यांनी घेतले उखाणे

मंडळाचे अध्यक्ष प्रतापराव वाढणे व अहिल्याबाई प्रतापराव वाढणे यांच्यासह धाडगे, चंदणे, बनकर, सुर्यवंशी, खांडेकर, अहिरे, कुलकर्णी, परमार, चव्हाण व गवारे या जोडप्यांचा विवाह लावण्यात आला. या विवाह सोहळ्यास प्रत्येकाच्या कुटुंबातील मुले, मुली, सुना, जावई, नातू उपस्थित होते. प्रत्येकाच्या नातेवाईकांनी 50 वर्षे पुर्ण केलेल्या आपल्या आई वडिलांना, आजी आजोबांना मुंडावळ्या बांधल्या, काहीजण विवाह सोहळ्याच्या वेळेस त्यांच्या पाठिमागे उभे राहिले. काहीजणांनी अंतरपाट धरला , मंगलाष्टके म्हटल्यावर वधू वरांनी एकमेकास पुष्पहार घातले. सर्व 11 जोडप्यांनी आनंदाने उखाणे घेवून उपस्थितांचे मनोरंजन केले. विवाहसोहळ्या नंतर सर्वांना काही प्रश्न विचारण्यात आले, त्यांची बिनधास्त उत्तर देवून उपस्थितांची दाद मिळवली. नंतर प्रत्येक विवाहीत जोडप्याचा यथोचित सत्कार करण्यात आला. त्यात वरास उपरणे, गुलाब पुष्प, व वधूस ओटी व गोदंवलेकर महाराजांचे प्रवचनांचे पुस्तक व सन्मान पत्र देण्यात आले. विवाहा प्रसंगी मंडळाच्या वतीने सुग्रास भोजन देखील ठेवण्यात आले होते.

यांची होती उपस्थिती

अशा ह्या अगळ्या, वेगळ्या सोहळ्याने प्रत्येक सभासदांच्या चेहऱ्यावर समाधान व आनंद दिसत होता. या कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून लोकज्योति ज्येष्ठ नागरिक मंचाचे उपाध्यक्ष सुर्यवंशी व पत्रकार नरेंद्र जोशी उपस्थित होते.

यांनी घेतले परिश्रम

कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यात साठी मंडळाचे सेक्रेटरी, श्री. सुधाकर भोईसर, श्री अनिल विभांडीक, श्री एकनाथ पगार, मंडळाचे अध्यक्ष श्री. प्रतापराव वाढणे, श्री. राजेंद्र वाघमारे, श्रीमती वैशाली मुठे, सौ.नंदिनी पगार, सौ.अंजली वाघमारे, श्रीमती उर्मिला ठाकूर यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री.सतीश जोशी यांनी केले. या समारंभासाठी शुभेच्छा लॉन्सचे संचालक चेतन वाढणे यांनी केलेल्या सहकार्यामुळेच सदर समारंभ यशस्वीपणे पार पाडण्यास मदत झाली.

बातम्या आणखी आहेत...