आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेमडेसिविर इंजेक्शन:रेमडेसिविरसाठी कृषिमंत्री भुसेंचा दोन तास ठिय्या, अखेर मालेगावसाठी अधिकाऱ्यांनी मिळवून दिली 100 इंजेक्शन

नाशिक2 वर्षांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • अधिकाऱ्यांची भंबेरी एफडीए कार्यालयामध्ये इंजेक्शन वाटपाबाबत मागितली माहिती

मालेगावमध्ये एकही रेमडेसिविर इंजेक्शन न पाठविल्यामुळे संतप्त झालेल्या कृषिमंत्री दादा भुसे यांनी एफडीएच्या कार्यालयात दोन तास ठिय्या दिला. इंजेक्शन मिळाल्याशिवाय न जाण्याचा पावित्रा मंत्रीमहोदयांनी घेतल्यामुळे अधिकाऱ्यांची धावपळ उडाली. दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अधिकाऱ्यांनी मालेगावमधील ११ हॉस्पिटल्ससाठी १०० इंजेक्शन उपलब्ध करून दिल्यानंतर भुसे यांनी कार्यालय सोडले.

सध्या या इंजेक्शनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात झाला आहे. जिल्ह्यासाठी उपलब्ध होणारा साठा समसमान प्रमाणात तालुकापातळीवर वाटप करण्याचे धोरण असतानाही एफडीएच्या अधिकाऱ्यांकडून बड्या खासगी हॉस्पिटलला साठा उपलब्ध करून दिला जात असल्याचे मंत्रीमहोदयांच्या निदर्शनास आले. त्यांनी अधिकाऱ्यांकडे इंजेक्शन कशाप्रकारे वाटप केली याची माहिती मागितली. यावेळी सहआयुक्त दुष्यंत भामरे, माधुरी पवार

या हॉस्पिटलसाठी इंजेक्शन

 • सहारा हॉस्पिटल (डीसीएचसी) १६
 • सिक्स सिग्मा हॉस्पिटल : ११
 • द्वारकामणी हॉस्पिटल : ०६
 • सहारा हॉस्पिटल (डीसीएच) : ११
 • एम एस जी (डीसीएचसी) : ०७
 • सुविधा हॉस्पिटल : ०४
 • जी. एच. मालेगाव : २३
 • एमएसजी (सीसीसी) : ०८
 • संकल्प हॉस्पिटल : ०५
 • लोटस हॉस्पिटल : ०५
 • जीवन हॉस्पिटल : ०४
 • एकूण : १००

सिन्नरच्या २ ऑक्सिजन कंपनी घेणार ताब्यात
ऑक्सिजनचा मोठा तुटवडा असल्याने सिन्नरमधील बंद पडलेल्या दोन ऑक्सिजन कंपन्या ताब्यात घेतल्या जाणार असल्याची माहिती भुसे यांनी दिली. मुंबई व सिंधूदुर्ग येथून लिक्विड ऑक्सिजनचे टँकर भरण्यास उशीर होत असल्याने शासनपातळीवर तोडगा काढला जाईल. औद्योगिक ऑक्सिजनचा पुरवठा बंद करून तो आरोग्य यंत्रणेसाठी वापरण्यास देण्यात येणार असल्याचे सांगितले.

नाशिकला दिलासा जिल्ह्यात दिवसभरात ३९२८ रुग्ण बरे
नाशिक | जिल्ह्यात सोमवारी (दि. १२) कोरोनाने उच्चांकी ३८ रुग्णांचा मृत्यू झाला. दिवसभरात ३ हजार ५८८ नवे रुग्ण आढळले असून ३ हजार ९२८ रुग्ण बरे झाल्याने गत पंधरवड्यात प्रथमच सक्रिय रुग्णसंख्या ३४० ने घटली. आतापर्यंत जिल्ह्यात २ लाख ३३ हजार ६२९ जणांना संसर्ग झाला. २ लाख ९४ हजार २६७ म्हणजे ८३.१५ टक्के रुग्ण बरे झाले. २७२० जणांचा मृत्यू झाला. ३६६४२ रुग्ण उपचार घेत आहेत.

दि. १२ चे नवे रुग्ण
नाशिक मनपा- १८८७
नाशिक ग्रामीण- १५६८
मालेगाव मनपा- ००९५
जिल्हा बाह्य- ००३८,

दि. १२ चे मृत्यू
नाशिक मनपा-१३
मालेगाव मनपा-२
नाशिक ग्रामीण-२२
जिल्हा बाह्य-१


बातम्या आणखी आहेत...