आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातासिका तत्वावरील प्राध्यापकांकडून सुरू असलेले आंदाेलन तीव्र रूप धारण करीत असून उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्याची दखल घेत प्राध्यापकांचे मानधन ६५० वरून ९०० रू. प्रति तास करणार असल्याचे औरंगाबाद येथे एका कार्यक्रमात सांगितले. राज्यातील विद्यापीठे व महाविद्यालयातील रिक्त जागा डिसेंबरपर्यंत भरण्यात येतील. २०८८ जागा भरल्यानंतर आढावा घेऊन उर्वरित जागा भरण्यासही मान्यता देण्यात येणार आहे.
राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये ६५ हजार विद्यार्थी शिकण्याची क्षमता आहे. यंदा त्यातील २८ हजार प्रवेश झालेले नाहीत. त्यामुळे कृषी संस्थांची आता गरज नाही, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले. रासेयोच्या स्वयंसेवकांची नोकरीत भरती करण्याबाबात आम्ही विचार करत आहोत. बार्टी, सारथी आणि महाज्योतीच्या फेलोशिपमध्ये आम्ही समानता आणण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन चंद्रकांत पाटील यांनी दिले.
दीक्षांत समारंभ होणार नाहीत चार वर्षांचा अभ्यासक्रम करता येणार असल्यामुळे विद्यार्थ्याला विविध विषय एकाच पदवीसाठी निवडता येतील. त्याला त्याचे क्रेडिट स्कोअर डिजी लॉकरमध्ये जमा होतील. तो कुठल्याही वर्षी बाहेर पडू शकतो अन् पुन्हा आत येऊ शकतो. ज्या दिवशी तो पदवी पूर्ण करेल त्याच दिवशी त्याचे पदवी प्रमाणपत्र त्याच्या डिजी लॉकरमध्ये येऊन पडेल. त्यामुळे यापुढे दीक्षांत समारंभ घेण्याची गरजच पडणार नाही, असेही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.