आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाविकांचे श्रद्धास्थान:महिनाभरात हाेणार दशक्रिया विधी शेडचे नूतनीकरण

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गाेदाकाठी, रामकुंडावर देशभरातून नागरिक विविध पूजादी विधींसाठी येत असतात. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला दशक्रिया विधीला विशेष महत्त्व असल्याच्या आख्यायिका आहेत. त्यामुळे येथे नाशिकसह देशभरातून दशक्रिया विधी हाेत असतात. त्यासाठी बांधलेल्या शेडची माेठ्या प्रमाणात दुरवस्था झाली हाेती. त्याच्या नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून महिनाभरात ते काम पूर्ण हाेणार असल्याचे स्मार्ट सिटीचे सीईआे सुमंत माेरे यांनी सांगितले.

स्मार्ट सिटीच्या विविध कामांमध्ये प्राेजेक्ट गाेदा अंतर्गत गाेदाकाठी विविध कामे हाेत आहेत. रामकुंड परिसरात असलेल्या दशक्रिया विधी शेड येथे राेज शेकडाे नागरिक येत असतात. मात्र पुरामुळे या दशक्रिया शेडची दुरवस्था झाली आहे. याबाबत नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर स्मार्ट सिटीने शेड दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. या ठिकाणी फरशा बसविणे, डाेमची दुरुस्ती व रंगरंगाेेटी करण्यात येणार आहे. महिनाभरात हे काम पूर्ण हाेणार असल्याची माहिती स्मार्ट सिटीचे सीईआे सुमंत माेरे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...