आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्याकडून नवीन नाट्यनिर्मितीसाठी राज्य शासनाच्या अनुदान योजनेअंतर्गत नाट्य परीक्षण समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. या समितीत 23 अशासकीय सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. ही समिती व्यावसायिक, संगीत आणि प्रायोगिक नाटकांचे परीक्षण करणार आहे.
अनेक नवीन नाटकांची निर्मिती होत आहे. त्यातील अनेक नाट्य निर्मितीसाठी राज्य शासनाकडून अनुदानही देण्यात येते. मात्र ती निर्मिती अनुदानासाठी पात्र आहे की नाही किंबहुना ते नाटक अनुदानासाठी पात्र आहे की नाही, नियमात ते नाटक बसते की नाही याची ही समिती आहे. आता या समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. या समितत अनेक ज्येष्ठ रंगकर्मी, कलाकार, तंत्रज्ञ आणि लेखकांचा समावेश करण्यात आल्याने ही समिती नाटकाच्या दृष्टीने सर्व समावेशक असल्याचे बोलले जात आहे.
परीक्षण हे तज्ज्ञांमार्फतच
नाटकांचे परीक्षण हे तज्ज्ञांमार्फतच करण्यात येणार असून प्रशासकीय अधिकारी असणाऱ्या संचालकांना नाटकांचे परीक्षण करण्याचे अधिकार देण्यात आलेले नाहीत. या समितीचा कार्यकाळ पुढील तीन वर्षे किंवा समितीची पुनर्रचना होईपर्यंत यापैकी जे अगोदर होईल तोपर्यंत असेल.
या आहेत अटी
नाट्य परीक्षण समितीमधील सदस्य अनुदानासाठी अर्ज केलेल्या नाटकाच्या लेखन, दिग्दर्शन, अभिनय, तंत्रज्ञ, संगीत किंवा अन्य बाबींशी संबंधित असल्यास त्या सदस्यास संबंधित नाटकाचे परीक्षण करता येणार नाही. नाटकाचे परीक्षण करण्यासाठी 223 सदस्यांपैकी किमान 11 सदस्यांची गणसंख्या असणे आवश्यक ठेवण्यात आली आहे.
समितीमध्ये यांचा समावेश
या समितीमध्ये अरुण नलावडे, मुकुंद चितळे, विश्वास सोहोनी, शिल्पा नवलकर, विक्रम भागवत, प्रल्हाद जाधव, किरण यज्ञोपावित, रवींद्र खरे, राजन ताम्हाणे, शिवराय कुलकर्णी, राजेश चिटणीस, शैला सामंत, प्रो. वर्षा भोसले, वीरभद्र स्वामी, अभिराम भडकमकर, कुमार सोहोनी, शीतल तळपदे, स्वरुप खोपकर, अरुण होर्णेकर, सविता मालपेकर, अनिल गवस, सुनील बर्वे, सुधाकर गिते हे अशासकीय सदस्य असतील. सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक हे या समितीचे सदस्य सचिव असतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.