आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:लेमरोडसह देवळाली कॅम्पमध्ये रस्ते दुरुस्ती

देवळाली कॅम्पएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भगूर, देवळाली कॅम्पसह ५२ खेड्यांची रहदारी असलेला लेमरोड अतिशय खराब झाल्याने वाहन धारकांत संताप व्यक्त हाेत हाेता. शिवाय कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील आठीही वॉर्डातील रस्त्याची झालेली दुरवस्था चीड आणणारी ठरत हाेती. मात्र याची दखल घेत आमदार सरोज अहिरे यांच्या मध्यामतून लेमेरोडचे तर देवळाली कॅम्प कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. राहुल गजभिये यांच्या प्रयत्नांनी कॅम्प व शहरातील अंतर्गत रस्त्याची डागडुजीची कामे सुरू झाल्याने समाधान व्यक्त हाेत आहे.

देवळाली मतदारसंघाचे आमदार सरोज अहिरे यांनी लेमरोड रस्त्यासाठी ५ कोटींचा निधी प्राप्त करून माजी सार्वजनिक बांधकाम राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते रस्ता कामाला प्रारंभ केला, मात्र गेली चार महिने पावसाळ्यामुळे काम प्रलंबित राहिले. या दरम्यान पावसामुळे आहे त्या रस्त्याची अवस्था अतिशय खराब झाली हाेती. त्यामुळे वाहनधारक व नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला, अनेकांनी याबाबत जाहीर नाराजी व्यक्त करत आंदोलनाचा इशारा दिला हाेता. याची दखल घेत आमदार सरोज अहिरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना रस्ता कामाबाबत कार्यवाही करण्याचे आदेश दिले.

त्यानुसार नागझिरा नाला ते नाका नंबर सहा पर्यंतच्या रस्ता डागडुुजीला प्रारंभ झाला. तसेच कॅुुुन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील अंतर्गत रस्त्याची देखील रस्त्यांची अवस्था दयनीय झाल्याची असल्याने नागरिकांनी वेळोवेळी प्रशासनांकडे तक्रारी नोंदविल्या त्याची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. राहुल गजभिये यांच्या मार्गदर्शनाखाली अभियंता विलास पाटील व अभियंता पीयूष पाटील यांच्या देखरेखीखाली वडनेर रोड, महालक्ष्मी मंदिर रोड, बालगृह रोड या रस्त्यांच्या दुरुस्तीला प्रारंभ झाला आहे.

इतर रस्त्यांची कामेही लवकरच
कॅन्टोन्मेंट बोर्ड उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न करत आहे निधीची कमतरता असूनही चांगल्या सेवा देते आहे.आत्ता बालघर रोड काही रस्त्यांची कामे चालू झाली असून लवकरच सर्वांची कामे केली जातील आणि रेस्टकॅम्प रोडसह इतर रस्त्यांची कामे लवकर केली जातील. - डॉ राहुल गजभिये, मुख्य कार्यकारी अधिकारी कॅन्टोन्मेंट बोर्ड, देवळाली कॅम्प

बातम्या आणखी आहेत...