आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणीवर लग्नाचे आमिष दाखवत वारंवार अत्याचार:भाऊजी आणि होणाऱ्या नवऱ्यास पाठवले अश्लील व्हिडिओ

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तरुणीला लग्नाचे अमिष देत तीच्यावर बलात्कार करत त्याचे व्हिडिओ आणि फोटो काढून ब्लॅकमेल करत होणाऱ्या पतीला आणि नातेवाईकांना सोशलमिडियावर फोटो पाठवत ठरलेले लग्न मोडणाऱ्या संशयित तरुणाच्या विरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच संशयित युवक फरार झाला असून त्याचा शोध सुरु आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती आणि पिडीत तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित विश्वनाथ साईनाथ चव्हाण याच्या सोबत 2020 पासून ओळख होती संशयिताने लग्नाचे अमिष देत शहरातील हाॅटेल, गेस्ट हाऊस येथे नेऊन मनाविरुद्ध शारीरीक संबध ठेवले. यासंबधाचे मोबाईलमध्ये लपवून व्हिडीओ बनवला.

पिडीताने लग्न झाल्यानंतर संबध करु असे सांगितले मात्र संशयिताने नग्न फोटो आणि व्हिडिओ आई वडीलांना दाखवण्याची धमकी देत हाॅटेल लाॅजवर नेत वारंवार बलात्कार केला. 28 ऑगस्ट रोजी साखरपुड्याच्या दिवशी त्याने काॅल करुन बोलवले पिडीत युवतीने नकार दिला असता संशयिताने युवतीच्या मोबाईलवर आणि बहिणीचे मिस्टर यांना आणि होणारा पतीला गेस्ट हाऊसवर काढलेले नग्न फोटो पाठवले. याप्रकाराने ठरलेले लग्न मोडले. पोलिसांत तक्रार दिली. संशयिताच्या विरोधाता गुन्हा दाखल करण्यात आला मात्र संशयित फरार झाला. पोलिसांकडून त्याचा शोध सुरु आहे.

दोघे शेजारी राहणे

संशयित तरुणाचे आणि पिडीत तरुणीचे वडील दोघे नाशिकरोड परिसरातील तुरुंग प्रशासनात सोबत नोकरीला आहे. युवती आणि युवक दोघांची ओळख असल्याने प्रेमसंबध निर्माण झाले. संशयिताने याचा फायदा घेत पिडीतेला लग्नाचे अमिष देत बलात्कार केला.

आत्महत्या करण्याचा प्रयत्न

पिडीत युवतीचे अश्लिल फोटो दाजी आणि होणाऱ्या नवऱ्याला पाठवल्याने युवतीचे लग्न मोडले. संशयितांच्या वारंवार शारीरीक व मानसिक छळाला कंटाळून युवतीने 3 स्प्टेंबर रोजी फिनेल पिऊन आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला होता.

संशयित फरार

वरिष्ठ निरिक्षक अनिल शिंदे म्हणाले की, तरुणीने पोलिसांत तक्रार दिल्याची माहिती मिळाल्यानंतर संशयित फरार झाला. त्याचा शोध सुरु आहे. पथकाकडून संशयिताचा शोध सुरु आहे.

बातम्या आणखी आहेत...