आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सप्लेनर:माळीण दुर्घटनेची तळियेत पुनरावृत्ती, अतिवृष्टी ही नैसर्गिक आपत्ती, पण दरडी कोसळणे ही मानवनिर्मिती

नाशिक2 महिन्यांपूर्वीलेखक: दिप्ती राऊत
  • कॉपी लिंक

सह्याद्री पर्वतरांगेवर वसलेल्या महाड परिसरात दरडी कोसळणे नवे नाही. २००५ मध्ये या भागात २४ तासांत १७ दरडी कोसळून २०० जणांचा बळी गेला होता. त्यानंतर २००५ ते २०१० अशी ५ वर्ष भूशास्त्र अभ्यासक डॉ. सतीश ठिगळे यांनी महाड येथील भूभागाचा अभ्यास करून भविष्यातील धोक्याचा इशारा दिला होता. तळिये दुर्घटनेबाबत त्यांनी केलेले हे विश्लेषण.

प्रश्न : तळईची दुर्घटनाही माळीणप्रमाणेच आहे का?
डॉ ठिगळे : दोन्हीमध्ये वर उल्लेख केलेली साम्यस्थळे आहेत. माळीणमध्ये तीव्र उतारावर सपाटीकरणाचे काम झाले होते. परिणामी अतिवृष्टीच्या काळात डोंगरावरील पाणी दरडींसह खाली आले. तळईसह या वेळीही दरडी पडलेली ठिकाणे तीव्र डोंगरउतारावरील अतिवृष्टी होणाऱ्या परिसरातील आहेत. उर्वरित. पान ५

प्रश्न : आपला अभ्यास काय सांगतो?
डॉ.ठिगळे : २००५ मध्ये याच परिसरात २४ तासांत १७ दरडी कोसळून २०० बळी गेले होते. त्यानंतर २०१० पर्यंत मी तेथील माती, खडकांच्या भेगा, उतारावरील परिस्थिती व दरडींच्या ठिकाणांचा अभ्यास केला. जेथे तीव्र डोंगरउतारावर सपाटीकरण, वाड्यांची गावठाणे व वृक्षतोडीमुळे मानवी हस्तक्षेप झाला आहे तेथेच दरडी कोसळत असल्याचे दिसले.

प्रश्न : दरडी अतिवृष्टीमुळे कोसळल्यात का?
डॉ. ठिगळे : पावसाचे प्रमाण वाढले आहे हे वास्तव आहे. ती नैसर्गिक आपत्ती आहेच. मात्र, महाड परिसरात कोसळणाऱ्या दरडी हे मानवी हस्तक्षेपामुळे उद्धवणारे अपघात असल्याचे संशोधनातून पुढे आले. सावित्री नदीची उपनदी असलेल्या काळनदीच्या खोऱ्यातील या प्रदेश आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये तीव्र उतारावर वसलेल्या वस्त्या व गावठाणे आहेत. कोयनेतील भूकंपाच्या धक्क्यांमुळे या डोंगरांवरील माती-मुरमापासून बनलेले सच्छिद्र खडक कंप पावून मूळ खडकापासून सुटे झालेले दिसतात. एकीकडे तीव्र उतार व दुसरीकडे ३८०० मिमी अतिवृष्टीमुळे महाड अशा अपघातांसाठी अत्यंत संवेदनशील झाला आहे. तळियेत असेच घडल्याचे दिसते.

प्रश्न : यावर उपाय काय?
डॉ.ठिगळे : पाऊस रात्रीत कोसळत असला तरी दरड निखळण्याची प्रक्रिया एका रात्रीत होत नसते. डोंगराला वरच्या बाजूस दिसतील अशा भेगा पडत असतात. झाडे कोसळत असतात. उन्हाळ्यात याची पाहणी करून पावसाळ्यातील अशा आपत्ती टाळणे शक्य आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील या दरडप्रवण गावांची व परिसराची माहिती आम्ही शासनाला दिली आहे. माथ्यावरील पाण्याचा लवकर निचरा होईल अशी व्यवस्था करणे आणि धोकादायक परिस्थितीस कारणीभूत मानवी हस्तक्षेप टाळणे हेच याचे उपाय आहेत. प्रशासकीय कार्यक्षमता आणि राजकीय इच्छाशक्ती यातून अशा दरडी कोसळण्यातून होणारी हानी थांबवणे शक्य आहे. माळीण दुर्घटनेनंतर असे अपघात रोखण्याच्या दृष्टीने शिफारसींचा अहवाल आम्ही शासनाला दिला होता. त्याचे पुढे काय झाले माहीत नाही.

डॉ सतीश ठिगळे, निवृत्त भूशास्त्र विभाग प्रमुख, पुणे विद्यापीठ

बातम्या आणखी आहेत...