आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक महापालिकेकडे चक्क अडीचशे रुपये सुद्धा नाहीत. उद्यान विभागाचे हे अजब उत्तर ऐकुण नागरिकही अवाक झालेत. पाथर्डी फाटा परिसरातील गामणे मैदान येथे आमदार निधीतून लहान मुलांची खेळणी बसविण्यात आली. त्यातील काही खेळणी तुटल्या आहेत. या खेळणीची निगा ठेवण्यासाठी व एका खेळणी दुरुस्त करण्यासाठी महापालिकेच्या सिडको विभागीय अधिकारी यांच्याकडे नागरिकांनी तक्रार केली असता 250 ते 300 रुपयांच्या एका 'क्लिप'साठी निधी उपलब्ध नसल्याचे उत्तर देण्यात आल्याची धक्कादायक बाबसमोर आली आहे.
अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष सुरू
गामणे मैदानात आमदार निधीतून ग्रीन जिम बसवण्यात आले. यातील वर्षभरापासून 1 झोका किरकोळ कारणामुळे तुटला आहे. या झोक्याची तक्रार करूनही त्याकडे अधिकारी लक्ष्य देण्यास तयार नाही. त्याची दुरुस्ती करण्यासाठी किरकोळ निधी नसल्याचे सांगतात. त्यामुळे आमदार निधीतीतून बसवलेले खेळणी नादुरुस्त व पडीक स्वरुपात आहे. येथे येणारी बालगोपाळांची गर्दी लक्ष्यात घेता नवीन खेळणी बसवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. याकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने नागरिकांमध्ये निराशा आहे. मनपा अधिकारी हे मनमानी कारभार करतात. मनपात नगरसेवक नसल्याने तक्रार करण्याकरता लोकप्रतिनिधी नाही, अशी खंत नागरिक व्यक्त करत आहे.
किरकोळ खर्चासाठी निधी नाही?
झोक्याचा त्रिकोणी अँगल नाही तो बसवण्यासाठी खूप किरकोळ खर्च आहे, परंतु त्यासाठी निधी नसणे ही शोकांतिका आहे. बाजूच्याच उद्यानास देखरेख करता लाखो रुपयाचे कंत्राट दिले जाते. यासाठी मनपा आयुक्तांनी निधी उपलब्ध करून द्यावा ही मागणी तक्रारदार दर्शन लढ्ढा यांनी केली.
अजब कारभार
मनपा एकीकडे लाखो रुपये खर्च करतात. पण बाल गोपाळांच्या मनोरंजनाच्या खेळणी दुरुस्तीसाठी त्यांच्याकडे निधी उपलब्ध नसल्याने अजब नगराचा गजब कारभार म्हणावे की काय, असे स्थानिक नागरिक संतोष भांदुर्गे यांनी म्हटले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.