आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्रातील 31 पोलिसांना शौर्य पोलिस पदक:4 अधिकाऱ्यांना राष्ट्रपदी पदक, 39 जणांना गुणवंत पदक, होम मिनिस्ट्रीची घोषणा

नाशिक8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीने घोषणा करण्यात येणाऱ्या पाेलिस पदकांमध्ये महाराष्ट्रातील 31 पोलिसांना शौर्य पोलीस पदक जाहीर झाले आहे. तर 4 अधिकाऱ्यांनाना राष्ट्रपदी शाैर्य पदक जाहीर झाले. 39 पोलिस अधिकारी- कर्मचाऱ्यांना गुणवंत पोलिस पदक जाहीर झाले आहे.

कडनोरांना गुणवंत पोलिस पदक

नाशिक पाेलिस आयुक्तालयातील सहायक उपनिरीक्षक दत्तात्रय कडनोर यांना गुणवंत पोलिस पदक जाहीर झाले आहे. तर परिक्षेत्रातील सुखदेव मुरकुटे यांचा समावेश असून नाशिकमधील तत्कालीन सहायक निरीक्षक व सद्याचे काेल्हापूर पाेलिस अधीक्षक कार्यालयातील विशेष शाखेचे वरिष्ठ निरीक्षक तानाजी सावंत यांना राष्ट्रपतींचे शाैर्य पदक जाहीर करण्यात आले आहे.

सावंत यांची उल्लेखनीय कामगिरी

काेल्हापूर जिल्हा विशेष शाखेत वरिष्ठ निरीक्षक म्हणनू कार्यरत असलेले तानाजी दिगंबर सावंत यांनी नाशिक पाेलिस आयुक्तालयात सहायक निरीक्षक असताना सराईत गुन्हेगार कातारी याच्याशी झालेल्या चकमकीतही महत्वाची भूमिका बजावली हाेती. त्यासह 100 हून अधिक गंभीर गुन्हे उघडकीस आणले हाेते. त्यापाठाेपाठ काेल्हापूर येथे स्थानिक गुन्हा शाेध पथकाचे निरीक्षक म्हणून सेवा बजावताना अनेक गंभीर गुन्हे उघडकीस आणले. सोबतच सामाजिक सलाेखा राखण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले हाेते.

दुसऱ्यांदा राष्ट्रपती पदाचे ठरले मानकरी

पाेलिस दलातील 29 वर्ष सेवेच्या काळात त्यांना आतापर्यंत उत्कृष्ठ कामगिरी बाबत एकूण 400 बक्षिसे मिळाली असून 2010 मध्ये उत्कृष्ठ अधिकारी म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्री हस्ते विशेष बक्षीस व सत्कार झाला होता. ते 2012 मध्ये पोलिस महासंचालक पदकाने सन्मानीत आहेत.

बिष्णोई गॅंगसोबत मुकाबला

28 जानेवारी 2020 रोजी किणी टोल नाक्यावर राजस्थानमधील कुख्यात 007 बिष्णोई गॅंग सोबत झालेल्या चकमकीत गँग लीडर शामलाल पुनिया याने केलेल्या फायरिंगचा समोरासमोर मुकाबला करून स्वतः तानाजी सावंत यांनी सर्व्हिस पिस्टल मधून 6 राऊंड फायर करून गुन्हेगारांना जखमी करून तीन कुख्यात गँगस्टरला जेरबंद केले हाेते.

हे गँगस्टर 2017 पासून राजस्थान पोलिसांना वॉन्टेड होते. टोल नाक्यावर रहदारी असताना गँगस्टरलाच गोळ्या लागून जखमी केले हाेते. या कामगिरीबद्दल छत्रपती श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते कोल्हापूरचे मानपत्र देऊन गौरव झाला आहे. तसेच पोलिस महासंचालक यांनी 1 लाख रुपये रोख व गृह विाभागकडून गौरविण्यात आले.

पोलिस दलात कामगिरी करताना अनेक कुख्यात गुंडांना जेरबंद,जनतेच्या चोरीला गेल्याचे करोड रुपयांचा मुद्देमाल हस्तगत गुणवत्तापूर्ण सेवेची केंद्र शासनाने दखल घेऊन 26 जानेवारी 2021 राष्ट्रपतींचे पोलीस पदकाने सन्मानीत केले धाडशी कामगिरीबाबत पोलीस निरीक्षक तानाजी सावंत आणि पोलीस हवालदार नामदेव यादव यांना 26 साजऱ्या होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त पोलीस दलातील मानाचे राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक जाहीर झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...