आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर वृक्षसंवर्धन आणि पर्यावरण जतनाच्या भूमिकेतून ‘दिव्य मराठी’, अनमोल नयनतारा आणि विजयश्री सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने “अक्षय्य वृक्ष अभियाना’स प्रारंभ झाला आहे. तिडके कॉलनी येथील अनमोल नयनतारा सिटी १ या कॉलनीतील पर्यावरणप्रेमी नागरिकांनी कुसमाडी पद्धतीने तब्बल ५०० वृक्षांच्या संगोपनाची जबाबदारी आनंदाने स्वीकारली.
पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने अनेकदा नागरिक मोठ्या उत्साहात वृक्षारोपण करतात, मात्र हवामानाच्या प्रतिकूल बदलांचे ते बळी ठरतात. यावर यशस्वी उपाय ठरलेल्या कुसमाडी पद्धतीबद्दल विजयश्री सेवा संस्थेचे मनोज साठे यांनी नागरिकांशी संवाद साधला.
जैविक खते मिश्रित माती आणि मुळांच्या वाढीस पूरक तीन फुटांच्या ग्रो बॅगच्या माध्यमातून या वृक्षांच्या जगण्याची शक्यता कशी वाढते याची शास्त्रशुद्ध माहिती त्यांनी यावेळी दिली. अनमोल नयनताराचे सेल्स अँण्ड मार्केटिंग हेड लौकिक तातेड यांनी पर्यावरण संवर्धनासाठी कटिबद्ध ग्रीन बिल्डिंगची रचना यावेळी स्पष्ट केली. लौकिक तातेड यांच्यासह अनमोल नयनताराचे सीईओ शनय लढ्ढा आणि अपार्टमेंटचे चेअरमन अॅड. आनंद गायकवाड यांच्या हस्ते सोसायटीतील सदस्यांना प्रत्येकी एक बाल वृक्ष संगोपनासाठी देण्यात आला.
यात समाविष्ट कडूलिंब, वड, हिरडा, बेहडा, उंबर, काटे सावर या वृक्षांची आणि त्यांच्या संगोपनाबद्दल बेलगाव ढगा येथील सरपंच दत्तू ढगे, अंबरिश मोरे, प्रशांत परदेशी, चंद्रकिशोर पाटील आणि रमेश अय्यर यांनी नागरिकांना मार्गदर्शन केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.