आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Resolution To Plant 1 Lakh Trees From Bharatbhramanti; Plantation Of Trees In Honor Of Cyclist Pradeep Kumar Yadav Of Nashik Cyclist Foundation| Marathi News

दिव्य मराठी विशेष:भारतभ्रमंतीतून 1 लाख वृक्ष लागवडीचा संकल्प; नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचा सायकलिस्ट प्रदीपकुमार यादवच्या माेहिमेत वृक्षलागवड

नाशिक18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पर्यावरण संवर्धन करणे ही आपली प्रत्येकांची जबाबदारी आहे. आजच्या तंत्रज्ञानाचा काळात वाढत्या प्रदूषणामुळे पर्यावरणाला धाेका निर्माण हाेत आहे. याचमुळे नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी उत्तर प्रदेशातील गया येथील सायकलिस्ट प्रदीपकुमार यादव भारत भ्रमंतीवर निघालेला आहे.या माेहीमेत ताे तब्बल १ लाख वृक्ष लावणार आहे. रविवारी शहरात झालेल्या प्रदीप कुमारचे नाशिक सायकलिस्टकडून त्याचे स्वागत करत वृक्षाराेपण करत या माेहिमेत सहभाग नाेंदविला.

वाढत्या प्रदूषणामुळे पर्यावरणाची माेठी हानी हाेत आहे. ही हानी राेखण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती हाेणे गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर प्रदीप कुमारने भारतभ्रमंतीद्वारे वृक्ष लागवडीबाबत नागरिकांना आवाहन केले जात आहे.प्रदीपने आॅक्टाेबर २०२१ मध्ये सायकलद्वारे हा प्रवास सुरु केला. टप्प्याटप्प्याने हा प्रवास करत ताे नुकताच नाशिकला पाेहाेचला. यावेळी शहरातील विविध सामाजिक संस्थासह नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनकडून त्याचे स्वागत करण्यात आले. तसेच रविवारी नााशिक सायलिस्ट फाउंडेशनच्या सदस्यांकडून त्याच्या समवेत नाशिक-त्र्यंबकेश्वर राईड करण्यात आली.

यावेळी सदस्याकडून वृक्षाराेपण करण्यात आले. विशेष म्हणजे या राईडमध्ये प्रदीप हा शाळा-महाविद्यालयात जात विद्यार्थ्यांना या माेहिमेबाबत माहिती देत त्यांनाही वृक्ष लागवडीबाबत आवाहन केले जात आहे. पर्यावरणाचा रक्षणासाठी राबविल्या जात असलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र काैतुक करण्यात येत आहे. भारतभ्रमंतीतून सायकल चालविण्याचे आराेग्यास फायदे आदी बाबींचे महत्त्व पटवून देण्यात येत आहे. सायकलवर भारतभ्रमंतीवर असताना सामाजिक बांधिलकीतून अनेक विचार सामान्यांत रुजविले जातात.

२०२४ मध्ये पूर्ण हाेणार भारतभ्रमंती
प्रदीपची सायकलद्वारे भारतभ्रमंती ही साधारणत: २०२४ मध्ये पूर्ण हाेणार आहे. विशेष म्हणजे ताे या प्रवासावर निघतांना घरातून केवळ १४० रुपये घेऊन निघाला हाेता. वाटेत विविध संस्था, नागरिकांकडून त्यास मदत केली जाते.या प्रवासादरम्यान त्यास अनेक चांगले वाईट अनूभव आले. काहींना प्राेत्साहन दिले.कितीही अडथळे आले तरी पर्यावरणासाठी हा प्रवास पूर्ण करणारच असल्याचा निर्धार त्याने व्यक्त केला आहे.

बातम्या आणखी आहेत...