आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायक्लोथॉन स्पर्धा:प्राप्तिकर विभागाच्या वतीने सायक्लोथॉन स्पर्धेस प्रतिसाद ; सायकलिस्ट फाऊंडेशनचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी

नाशिक20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आझादी का अमृत महोत्सवाचे औचित्य साधत नाशिक प्राप्तिकर विभागाच्या वतीने आयोजित सायक्लोथॉन स्पर्धा मोठ्या उत्साहात रंगली. स्पर्धेत प्राप्तिकर विभागाचे अधिकारी, कर्मचारी, सीए, कर सल्लगार असोसिएशनचे पदाधिकारी व नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कान्हेरे मैदान येथून सकाळी साडेसहा वाजता सायक्लोथॉन स्पर्धेला प्रारंभ झाला. तेथून सीबीएस, रविवार कारंजा, निमाणी, रामवाडीमार्गे प्राप्तिकर कार्यालय येथे या स्पर्धेचा समारोप झाला. उपक्रमाचे उदघा्टन पुण्याचे मुख्य आयकर आयुक्त प्रवीण कुमार यांच्या हस्ते करण्यात आले. या सायक्लॉनच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाबरोबर नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जनजागृतीदेखील करण्यात आल़ी.मुख्य आयकर आयुक्त यशवंत चव्हाण, पुणे येथील आयकर आयुक्त संग्राम गायकवाड, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, बीएसएनएलचे जनरल मॅनेजर नितीन महाजन, वस्तू व सेवाकर विभागाच्या संयुक्त आयुक्त अनुश्री हर्डीकर, नाशिक सायकल फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र वानखेडे, किशोर काळे, जितेंद्र महाजन व महेंद्र महाजन उपस्थित होते. क्रांतिवीरांचे यावेळी स्मरण करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...