आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाची विश्रांती:पावसाची विश्रांती,उकाडा कायम; धोकेदायक फांद्या छाटणीच्या नावाखाली वीज ही केली खंडित

नाशिक12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मृगनक्षत्र सुरू झाल्यानंतर शहर आणि परिसरात दहा दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने तापमान पुन्हा वाढले आहे. उष्म्याने नागरिक हैराण झाले आहेत. पाऊस गायब झाल्याने बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. नाशिक शहरात जूनच्या मध्यावर प्रथमच इतकी उष्णता जाणवत आहे. पावसाची प्रतीक्षा कायम आहे. शनिवारी चटका लागणारे ऊन होते. यंदा रोहिणी नक्षत्रात मान्सूनपूर्व पाऊस झाला नाही, पण मृगनक्षत्र सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी शहर आणि परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर पावसाने पुन्हा दोन दिवस विश्रांती घेतली यंदा शेतकऱ्यांनी कांदा, मका, बाजरी आदी पिकांचे नियोजन केले आहे. मात्र पावसानेच दांडी मारल्याने नाशिकला लागून असलेल्या ग्रामीण भागातही पावसाची प्रतीक्षा आहे. त्यात काही भागात झाडांच्या धोकेदायक फांद्या छाटणीच्या नावाखाली वीज खंडित केली जात आहे. त्यामुळे उकाडा अधिक असह्य झाला आहे

बातम्या आणखी आहेत...