आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:परिणामी वाहने घसरून अपघात; मुंबई-आग्रा महामार्गावर अवैध माती वाहतुकीमुळे चिखल

घोटी10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इगतपुरी तालुक्यातील माणिकखांबजवळ दारणा धरणाच्या बॅकवॉटरमधून अवैध माती वाहतूक सुरू असून माती वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे मुंबई-आग्रा महामार्गावर सर्वत्र चिखल निर्माण झाला आहे. परिणामी वाहने घसरून अपघात होण्याचे प्रमाण वाढल्याची तक्रार वाहनचालकांसह माणिकखांबचे माजी सरपंच हरिश्चंद्र चव्हाण यांनी केली आहे.

धरणाच्या बॅकवॉटरमधून काळ्या मातीची अवैध वाहतूक होत आहे. वाहनांच्या चाकाला लागून आलेली तसेच वाहनातून पडणारी माती महामार्गावर पसरत आहे. त्यातच पाऊस पडल्याने चिखल निर्माण झाला आहे. त्यामुळे वाहनाने ब्रेक मारल्यास ती घसरून अपघात वाढले आहेत. या मार्गावर जड वाहनांची वर्दळ असल्याने थोडाही पाऊस आला तर चिखलात वाहने अडकून वाहनांच्या रांगा लागत आहेत.

बातम्या आणखी आहेत...