आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुर्ननोंदणी शुल्क न भरल्याचा फटका:यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने राखून ठेवले 2 हजार विद्यार्थ्यांचे निकाल

प्रतिनिधी | नाशिक21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने पुर्ननोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली खरी, पण आता पुर्ननोंदणी शुल्क २ हजार रुपये भरले नाही, म्हणून त्यांचे ऑगस्ट २०२१ चे निकाल मात्र राखून ठेवले आहे.

विशेष म्हणजे विद्यार्थी हितासाठी निर्णय घेतल्याचे दाखविले जात असताना प्रत्यक्षात मात्र ४ हजार विद्यार्थ्यांना २ हजार रुपये दिल्याखेरीज निकालपत्रक दिले जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अडवणूक केली जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून केला जात आहे.

मुक्त विद्यापीठाने पुर्ननोंदणीची प्रक्रीया सुरु केली आहे. त्यानुसार अभ्यासक्रम निश्चित वेळेत पूर्ण करु न शकलेल्या विद्यार्थ्यांनी पुर्नपरीक्षा देण्याची एक संधी देण्यात आली आहे. बी.ए. आणि बी.कॉम शिक्षणक्रमाच्या विद्यार्थ्यांपैकी १६ अंकी कायम नोंदणी क्रमांक (पी.आर.एन) असलेल्या ज्या विद्यार्थ्यांचा नोंदणी कालावधी संपलेला आहे, अशा विद्यार्त्यांसाठी ऑगस्ट २०२१ च्या परीक्षेच्या वेळी ऑनलाईन पध्दतीने २ हजार रुपये पुर्ननोंदणी शुल्क भरुन नोंदणी करण्याची व विहीत परीक्षा शुल्कासह ऑनलाईनच पुर्नपरीक्षा शुल्क भरण्याचे बंधनकारक केले. पण बहुतांशी विद्यार्थ्यांना हे २ हजार पुर्ननोंदणी शुल्क भरणे शक्य झाले नाही. अशा विद्यार्थ्यांचे निकाल विद्यापीठाने राखून ठेवले आहेत.

लिंक होईना उपलब्ध

पुर्ननोंदणी शुल्क भरल्याची पावती सादर केल्याशिवाय विद्यार्थ्यांना पुढील परीक्षेची लिंकच उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे त्यांना पुढील प्रवेशही घेता येत नसल्याने विद्यार्थ्यांचे आता शैक्षणिक नुकसान होण्याचीही शक्यता वाढली आहे.

या मेलवर पावती पाठविण्याचे आवाहन
babcomexam@ycmou.ac.in आणि nondani@ycmou.digitaluniversity.ac यावर २००० रुपयांचे शुल्क भरल्याची स्कॅन पावती सादर करण्याचे आवाहन विद्यापीठाने केले आहे.

विद्यार्थ्यांना ही माहीती द्यावी लागेल

पूर्ण नाव, कायम नोंदणी क्रमांक (पीआरएन), शिक्षण क्रमाचे नाव व संकेतांक, शिक्षणक्रम वर्ष, अभ्यासकेंद्र नाव व संकेतांक, मोबाईल नंबर, परीक्षेचा महिना व वर्ष ही माहीती द्यावी लागेल.

पुर्नपरीक्षेची संधी

विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांसाठी विशिष्ठ कालावधी ठरलेला आहे. त्या निश्चित कालावधीत शिक्षण पूर्ण न केलेल्या विद्यार्थ्यांसाठी पुर्नपरीक्षेची संधी विद्यापीठाने उपलब्ध करुन दिली आहे. त्यानुसार पीआरएन नंबर असलेल्या अन् त्याची मुदत संपलेल्या विद्यार्थ्यांसाठीच २ हजार रुपये पुर्ननोंदणी शुल्क आहे. तो विद्यापीठाचा नियमच आहे. त्यानुसार ज्या विद्यार्थ्यांनी शुल्क भरले त्यांना निकाल देतोय, ज्यांनी नाही भरले त्यांची प्रक्रीया सुरु असून, शुल्क भरताच निकाल दिले जातील. - भटूप्रसाद पाटील, परीक्षा नियंत्रक, मुक्त विद्यापीठ

बातम्या आणखी आहेत...