आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिप्र संस्थेतर्फे कृतज्ञता सोहळा:सेवानिवृत्त शिक्षकांनी संस्थेच्या उपक्रमात सहभागी व्हावे; अध्यक्ष डॉ. भरत केळकर यांचे आवाहन

नाशिकएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

सेवानिवृत्त शिक्षक मुख्याध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या ज्ञानाचा फायदा शाळांना करून देण्यासाठी संस्थेच्या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. भरत केळकर यांनी केले.

नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने संस्थेच्या शहरी व ग्रामीण भागातील विविध शाळांतून सेवानिवृत्त झालेले मुख्याध्यापक, पदाधिकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचा कृतज्ञता सोहळा जु. स. रुंग्टा हायस्कूलच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाप्रसंगी डॉ. केळकर बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. राजेंद्र कलाल होते. व्यासपीठावर संस्थेचे सचिव अश्विनीकुमार येवला, कार्यकारी मंडळाचे उपाध्यक्ष मारुती कुलकर्णी, खजिनदार अनिल दहिया, सहसचिव प्रसाद कुलकर्णी, मयूर कपाटे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे संस्थेचे सचिव अश्विनीकुमार येवला यांनी केले. डॉ. राजेंद्र कलाल म्हणाले की, आपल्या कामाचे सिंहावलकोन करून पुढील आयुष्याचे नियोजन करा तसेच प्रवाहाच्या बाहेर पडू नका. सतत सर्वांच्या संपर्कात रहा तसेच सेवानिवृतीनंतर आवडीचे क्षेत्राची निवड करून दुसऱ्याला मदत करा व हसत आयुष्य जगा, असे डॉ. कलाल म्हणाले. सूत्रसंचालन प्रीती कोठावदे व वैशाली गोसावी यांनी केले. पाहुण्यांचा परिचय सहसचिव प्रसाद कुलकर्णी यांनी करून दिले. स्वाती जोशी यांनी आभार मानले. शेवटी पसायदान झाले.