आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:रुग्णवाहिकेत विसरलेली पर्स केली परत ; चालकाचा असाही प्रामाणिकपणा

नाशिक19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अपघातग्रस्त कुटुंबीयाची रुग्णवाहिकेत विसरलेली पर्स रुग्णवाहिका चालकाने पोलिसांकडे परत करत आदर्श निर्माण केला. गुरुवारी (दि. ९) सायंकाळी पोलिसांनी पर्स जमा केली असून यामध्ये मौल्यवान दागिने आणि रक्कम आहे. पोलिसांनी संबंधीत पर्स मालकाशी संपर्क साधला आहे. कुटुंबातील चार सदस्यांवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याने पर्स नंतर नेणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. महामार्गावर हॉटेल सयाजी पॅलेससमोर शनिवारी (दि. ४) रात्री उड्डाणपुलालर पुढे जाणाऱ्या ट्रकवर कार आदळून अपघातात एक ठार आणि कारमधील दोन लहान मुलांसह चारजण जखमी झाले होते. अपघातग्रस्त कुटुंबीयांना खासगी रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जखमीमध्ये महिलेने रुग्णवाहिकेत गळ्यातील मंगळसूत्र, सोन्याचे अन्य दागिने आणि काही रक्कम असलेली पर्स ठेवली होती. जखमींना रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात सोडल्यानंतर अपघातग्रस्त महिला पर्स घेण्याचे विसरली. ही पर्स रुग्णवाहिकेत होती. गुरुवारी योगायोगाने रुग्णवाहिका चालक नारायण जेजूरकर हे जिल्हा रुग्णालयात रुग्ण सोडवण्यास गेले होते. या ठिकाणी अपघातग्रस्त कुटंुब भेटले. त्यांना चालक जेजूरकर यांना पर्सबाबत विचारले. जेजूरकर यांनी रुग्णवाहिकेत पाहणी केली मात्र पर्स मिळून आली नाही. संबंधीत कुटुंबीयांचा संपर्क नंबर घेत घरी गेल्यानंतर जेजूरकर यांनी पुन्हा रुग्णवाहिकेतून कानाकोपऱ्यात पाहणी केली असता सीटच्या खाली पर्स आढळून आली. जेजूरकर यांनाही चैन पडली नाही. पर्स परत करणे हा उद्देश ठेवत त्यांनी पंचवटी पोलिस ठाण्याचे कर्मचारी बाविस्कर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांना पोलिसांकडे पर्स जमा करण्यास सांगितले. जेजूरकर यांनी पर्स वरिष्ठ निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांच्याकडे सुपूर्द केली.

बातम्या आणखी आहेत...