आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आढावा:महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण, पण गुजरातेत मृत्यूदर 7.88; कोरोनाचा दहावा आठवडा, वृद्धांचे मृत्यू वाढले

नाशिक3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • महाराष्ट्रातील दहावा आठवडा; मृतांत 60 च्या वरचे सर्वाधिक

मुंबईमुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण व मृत्यूंचे असले तरी मृत्यूदरात राज्य तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अहवालात म्हटले  आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांचा देशातील सरासरी मृत्यूदर २.८९ आहे. महाराष्ट्रातील बळींचा आकडा मोठा असला तरी गुजरातचा मृत्यूदर सर्वाधिक ७.८८ आहे. महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या १ हजार व मृत्यू ६५ वर पोहोचले असले तरी मृत्यूदर ६.२९ आहे. दरहजारी रुग्णांमागे होणाऱ्या मृत्यूंनुसार प्रत्येक राज्याचा व देशाचा मृत्यूदर काढला जातो. जगभरात एकूण १२ लाख ७९,७२२ रुग्णांना हा संसर्ग झाल्यावर त्यातील ७२,६१४ रुग्ण दगावले. याचा अर्थ, जगाचा मृत्यूदर ५.६७ आहे.  महाराष्ट्राच्या तुलनेत १६% रुग्ण असलेल्या गुजरातचा मृत्यूदर देशात सर्वाधिक म्हणजे ७.८८ आहे. गुजरातमध्ये १६५ रुग्णांपैकी १३ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूदराबाबत पंजाब दुसऱ्या क्रमांकावर आहे. पंजाबमध्ये ९१ रुग्णांपैकी ७ जण दगावले आहेत. 

यांना मृत्यू रोखण्यात यश

दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक ६९० रुग्ण तामिळनाडूत आहेत, मृत्यूदर १.०१ आहे. केरळ, राजस्थान, यूपीलाही मृत्यूदर रोखण्यात यश आले आहे. दिल्लीत रुग्णसंख्या तिसऱ्या क्रमांकावर असली तरी मृत्यूंची संख्या कमी आहे.

महाराष्ट्रातील दहावा आठवडा; मृतांत ६०च्या वरचे सर्वाधिक

वैद्यकीय शिक्षण खात्यातर्फे साथीच्या सहाव्या आठवड्यात सर्व रुग्णांचे व मृत्यूंचे विश्लेषण झाले. त्या वेळी पहिल्या टप्प्यातील संसर्ग असल्याने परदेशी प्रवास केलेल्यांची संख्या सर्वाधिक होती. रुग्णांत तिशीच्या पुढील रुग्णांची संख्या अधिक होती. मात्र, सध्याच्या दहाव्या आठवड्यात राज्यातील ८६८ रुग्णांचे विश्लेषण केले असता वीस ते तीस या वयोगटातील रुग्णांची संख्या सर्वाधिक म्हणजे १८२ आहे, तर मृतांमध्ये ६० वर्षांवरील रुग्णांची संख्या सर्वाधिक म्हणजे ३२ आहे. 

वयोगट     रुग्ण     मृत्यू मृत्यूदर
१ ते १० वर्षे       २१     ०    ०
११ ते २० वर्षे    ५६    ०    ०
२१ ते ३० वर्षे    १८२    १    ०
३१ ते ४० वर्षे    १६७    २    १.२०
४१ ते ५० वर्षे    १६८    ६    ३.५७
५१ तेे ६० वर्षे    १३२    ११    ८.३३
६१ ते ७० वर्षे    ९५    २२    २३.१५
७१ ते ८० वर्षे    ३४    ०८    २३.५३
८१ ते ९० वर्षे    १२    ०२    १६.६६
९१ ते १०० वर्षे    ०१    ००    ०० 

(संदर्भ - वैद्यकीय शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन)

बातम्या आणखी आहेत...