आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइंदिरानगर -वडाळागाव-पाथर्डी राेड परिसरातील अवजड वाहनाच्या वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी रहिवाशी, राजकीय मंडळीने केलेल्या उपाेषणानंतर लागलीच पाेलिस यंत्रणेकडून एकत्रित बैठक घेत पर्यायी मार्ग म्हणून रिंगराेडचा प्रस्ताव पाेलिसांकडून मनपा व महामार्ग प्राधिकरणाकडे सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला. शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त सिताराम गायकवाड यांच्या कार्यालयात बुधवारी इंदिरानगर, वडाळागावातील प्रमुख राजकीय, व सामाजिक कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. इंदिरानगर परिसरात अवजड वाहनांमुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण हाेऊन अपघात घडत असल्याने वारंवार ही वाहतूक पर्यायी मार्गाने साेडविण्याची मागणी केली जात हाेती.
त्याची दखल घेतली जात नसल्याने अखेरीस लोकप्रतिनिधींच्या मार्गदर्शनाखाली दाेन दिवसांपूर्वी सामूहिक आंदाेलन केले गेले. त्याची दखल घेत पाेलिस उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या कार्यालयात लोकप्रतिनिधी व संस्था, आैद्याेगिक संघटनांच्या प्रतिनिधीच्या झालेल्या या बैठकीत अवजड वाहतुकीमुळे निर्माण हाेणाऱ्या समस्यांचा उहापाेह करण्यात आला. वाहतूकीचा प्रश्न सोडविण्याबाबत अनेक विचारमंथन करण्यात आले. यावर या मार्गाला पर्यायी एक रिंगराेड (वळणरस्ता) निर्मीतीचा प्रस्ताव मनपा व महामार्ग प्रशासनास सादर करून त्याची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार येईल, असे आश्वासन सहायक आयुक्त गायकवाड यांनी दिले.
निमा व आयमा प्रतिनिधींकडून सूचना
इंदिरानगर व तपोवन मार्गे होणारी अवजड वाहनांची वाहतूक बंद करता येईल का? अशी सूचना करताच सर्वांनी विराेध दर्शविला. मालवाहू वाहनांना इंदिरानगर भागातून प्रवेश बंद केल्यास औद्योगिक वसाहतीस कच्चा माल मिळण्यास होणाऱ्या विलंबामुळे त्याचे दुरगामी दुष्परिणाम होतील. मालवाहू वाहनांना प्रथम योग्य मार्ग (रिंगरोड) व थांब्यासाठी ट्रक टर्मिनस सुविधा उपलब्ध करून देणे अत्यावश्यक असल्याची बाब आयमा, निमा व ट्रक संघटनेच्या प्रतिनिधींनी बाेलून दाखविली.
संबंधित विभागाची लवकरच बैठक घेण्याचेही गायकवाड यांनी सांगितले. बैठकीस वरिष्ठ निरीक्षक सुभाष पवार, सुधीर ठाेंबरे, पराग जाधव, दिनकर कदम,राकेश हांडे, एस. आर. बांबळे, छाया देवरे, राजेंद्र वाघ, आयमा, निमा व ट्रक संघटनेचे प्रतिनिधी राजेंद्र फड, मनीष रावल, किशोर इंगळे, रवींद्र झोपे, संजय सोनवणे, सुदर्शन डोंगरे, अमोल शेळके व मनपा प्रतिनिधी, आैद्याेगिक संघटना तसेच ट्रक मालक-चालक संघटनेचे सदस्य उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.