आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गझलाेत्सवाचे आयाेजन:गझलेला दाद; विठोबा संपली वारी पुस्तकाचे प्रकाशन

नाशिक16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रोज नव्याने समोर येते एक शक्यता आयुष्याचा मार्ग बदलते एक शक्यता या सचिन सातळकरांच्या ओळी किंवा, राजेश्वर शेळकेंच्या हळूच होते श्वासांवरती स्वार गझल क्षणात जाते दुनियेच्याही पार गझल अशा ओळींनी गझलाेत्सवात रंग भरले.

गझलप्रेमींच्या वतीने कुसुमाग्रज स्मारकात गझलाेत्सवाचे आयाेजन करण्यात आले हाेते. यावेळी तव्याखाली भाकरीस अतुर एक लाकूड अजून जळतं आहे... असे म्हणत भूषण मटकरी यांनी शेतकऱ्यांच्या दाहक वास्तवाचा वेध घेतला. तर प्रश्न येईल यंदा परिक्षेमधे... कोणता देश हतबल पुढाऱ्यापुढे असे विरेंद्र बेडसे यांनी मांडत व्यवस्थेवर ताशेरे आेढले. निशिगंधा घाणेकरांनी मनाचा निळा कोपरा दे जरासा... मला त्या तुझ्या आसमंतातला... म्हणत मनाेभावना व्यक्त केल्या. आरती बोराडे यांनी ‘मासोळया डोळ्यांची नार’ ही कविता सादर केली आणि “तुझे रे जीवना कोडे मला नाही उमगले बघ मला इतकेच कळले की मला काही न कळले बघ”ही दिवंगत कवी कमलाकर देसले यांची गझल ओम देसले यांनी सादर केली.

यावेळी गझलकार सतीश दराडे यांच्या “विठोबा संपली वारी” या पुस्तकाचे प्रकाशन सजंय शिंदे, संजय चौधरी, मारुती मानेमोड यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला नीलेश मधुकर राणे, डी. जे. हंसवाणी, संताेष वाटपाडे यांच्यासह मान्यवर उपस्थित हाेते. सूत्रसंचालन जयश्री वाघ आणि आकाश कंकाळ यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...