आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भय इथले संपत नाही:नाशिकमध्ये 39 दिवसांत 8 खून, 5 प्राणघातक हल्ले, 38 स्ट्रीट क्राइमचे गुन्हे; कुठं नेऊन ठेवलंय शहर माझं?

नाशिक24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढले असून, 1 मे ते 8 जून या 39 दिवसांच्या कालावधीत परिमंडळ 1 व 2 मधील 13 पोलिस ठाण्याच्या हद्दीत 8 खून 5 प्राणघातक हल्ले आणि 38 रस्त्यावरील हणामीच्या घटनांची नोंद करण्यात आली आहे. वाढते गुन्हे रोखण्यास पोलिस यंत्रणेला अपयश येत असल्याने यंत्रणेवर सर्वस्तरावर टीका होत आहे.

खुनाची मालिकाच सुरू

शहर व परिसरात किरकोळ कारणांतून गंभीर गुन्ह्यांत रुपांतर होण्याची शक्यता असते. मात्र, यंत्रणेकडून या किरकोळ गुन्ह्यांकडे गांभीर्याने न बघता दोन्ही बाजुच्या तक्रारदारांशी सौम्यपणे व्यावहार केला जात असल्याचा आरोप होत आहे. पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी 21 एप्रिल रोजी पदभार स्वीकारला आहे. पदभार स्वीकारतांना शहरातील गुन्हेगारीचा आढावा घेऊन पुढील रणनिती ठरवली जाईल, असे आश्वासन आयुक्तांनी पत्रकार परिषदेत दिले होते. मात्र 20 दिवसांत शहरात खुनाची मालिका सुरू झाली.

असे पडले मुडदे

16 मे आडगाव येथे पतीने पत्नीचा खून केला. 19 मे, म्हसरुळमध्ये मित्राच्या भांडणात मध्यस्थी केल्याने तरुणाचा जीव गेला. 20 मे गंगापूर मित्रांनी मित्राचा खून केला. 20 मे पंचवटीमध्ये बापाने मुलाचा गळा दाबून खुन केला. 20 मे धक्का लागल्याचा जाब विचारणाऱ्या एसी दुरस्थी करणाऱ्या कारागीराचा खून झाला. 28 मे मित्राच्या भांडणात मध्यस्थी करणाऱ्या मित्राचा खून करण्यात आला. 1 जून आईवरुन शिव्या दिल्याने मित्राने मित्राचा भोकसून खून केला. 7 जून रोजी अंबडमध्ये कंपनी व्यवस्थापकाचा खून करण्यात आला. सर्वच गुन्हे उघडकीस आल्याने पोलिस यंत्रणेला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

हल्ल्यात गंभीर जखमी

प्राणघातक हल्ल्याचे म्हसरुळ 1 नाशिकरोड 1, पंचवटी 2 आडगाव 1 असे 5 गुन्हे आणि 38 हणामारीच्या घटना घडल्या आहेत. सर्वाधिक हणामारीचे गुन्हे पंचवटी 10, अंबड 7 नाशिकरोड 7 मुंबई नाका 5 देवळाली कॅम्प 5 भद्रकाली 4 गंगापूर 4 उपनगर 3 म्हसरुळ 3 आडगाव 2

अधिकाऱ्यांचा वचक नाही

परिमंडळ 1 व 2 मधील उपआयुक्त, 4 विभागाचे सहायक आयुक्त आणि 13 पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरिक्षक गुन्हे रोखण्यासाठी अपयशी ठरले असल्याचे वाढत्याय गुन्ह्यांतून निदर्शनास येत आहे.

बातम्या आणखी आहेत...