आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामोबाइल शिवाय एक दिवस’ या विषयावर आयोजित वक्तृत्व स्पर्धेत छोट्या गटात अर्जुन ठाकूर तर मोठ्या गटात रितेश धुमाळ यांनी प्रथम पारितोषिक पटकावले. जागतिक रेडिओ दिनानिमित्त विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्युट, नाशिक यांच्यातर्फे आयोजित ही स्पर्धा विश्वास हब, सावरकरनगर येथे पार पडली. विजेत्यांना कवयित्री, लेखिका मेघना साने यांच्या हस्ते पारिताेषिके देऊन गौरविण्यात आले.
यावेळी मेघना साने म्हणाल्या की, लेखन, विचार करणे ही प्रक्रिया व्यक्तीच्या मूलभूत गरजांशी निगडित आहे. विचार हे वैचारिक क्रांती घडवण्यासाठी माध्यम असून त्याचा आविष्कार लेखनातून येतो. त्यासाठी उत्तम पुस्तकांचे वाचन, चिंतनातून वक्तृत्व कला विकसित होत असते म्हणून ही स्पर्धा पुस्तक चळवळीला व वक्तृत्व केलेला नवा विचार देणारी आहे. पुस्तकांचे जग हे जीवनमार्ग दाखवणारी नवी वाट असते त्याची साधना करावी, उत्तम ग्रंथ वाचावेत व जीवन आनंदी करावे. विश्वास ठाकूर म्हणाले की, जीवनाचा आस्वाद व आनंद घेण्यासाठी आवडतं माध्यम म्हणून रेडिओ प्रसिद्ध आहे.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. मनोज शिंपी म्हणाले की, ग्रामीण भागात सर्वांसाठी शिक्षण, आरोग्य याविषयी जनचळवळ उभारली आहे. जनतेचे मूलभूत प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे त्यामुळे जनतेत जनजागृती होत आहे. ऋचिता ठाकूर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी कैलास कमोद, विश्वास देशपांडे, डॉ. गणेश गोविलकर, प्रमोद पुराणिक, विवेक केळकर, राधिका जोशी, गौरव तेजाळे, संजीव गानू, मंगला कमोद, सुमती पवार, प्रांजली आफळे, डाॅ. हरिभाऊ कुलकर्णी आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.