आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरधाव वेगाचे 2 बळी:पेठ रोड जेलरोडवर वेगवेगळ्या अपघातात 2 दुचाकी चालक ठार

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात वाहनांच्या वेग मर्यादा नियमांचे उल्लंघन होत असून भरधाव वेगाने दोन बळी घेतले. पेठरोड आणि जेलरोड येथे झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात अनोळखी वाहनांच्या धडकेत दोन दुचाकी चालक ठार झाले. म्हसरुळ, नाशिकरोड पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती आणि राहुल तांदळे (रा. कोळवाडा, हिरावाडी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, भाऊ संतोष बाळकृष्ण चारोस्कर (वय 29 रा. मखमलाबाद हे त्यांची दुचाकी (एमएच 15 ई. आर. 6623) ने जात असतांना प्रभात नगर राऊ हाॅटेल कडून भरधाव वेगात येणाऱ्या अनोळखी चारचाकी वाहनाने दुचाकीला सोमरुन धडक दिली.

या धडकेत संतोष चारोस्कर च्या डोक्यास पाटास गंभीर मार लागला. दवाखान्यात दाखल केले असता उपचार सुरु असतांना मृत्यू झाला. म्हसरूळ पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या घटनेत राकेश साबळे (रा. माने नगर) रासबिहारी लिंक रोड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रात्री 10.45 वाजता जेलरोड पाण्याच्या टाकी येथे थांबलेले असतांना रात्री 10.45 वाजता श्रीकांत विजय साबळे वय 45 (रा. अपुर्व कालीन टाकळी जवळ, जेलरोड) हे दुचाकी एमएच 15 जीएन 5971 वरुन भेटण्यास आला असता कॅनलरोड कडे वळण घेताना नांदुरनाक्याकडून जेलरोडकडे जाणाऱ्या चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिली. या धडकेत श्रीकांत साबळे गंभीर जखमी झाले. त्यांना दवाखान्यात दाखल केले असता उपचार सुरु असतांना मृत्यू झाला. नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भरधाव वेगावर नियंत्रण नाही

शहरात रात्रीच्या वेळी वाहनांच्या वेगावर नियंत्रण नसल्याने अपघातात वाढ झाली आहे. रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त नसल्याने वाहन चालक मोकाटपणे वाहवे वेगात चालवत अपघातांना निमंत्रण देत आहे. रात्रीच्या वेळी होणाऱ्या वाहतूकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस यंत्रणेकडून नाकेबंदी कारवाई करण्याची मागणी नागरीकांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...