आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समस्या:उपेंद्रनगरला रस्त्यावर ड्रेनेजचे पाणी; परिसरात सर्वत्र दुर्गंधी

सिडकाेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उपेंद्रनगर येथे अंबड लिंकरोडवर रहदारीच्या मुख्य रस्त्यावर मागील दोन ते तीन महिन्यांपासून ड्रेनेज तुंबून त्यातील दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर वाहत आहे. याबाबत नागरिकांनी महापालिकेत तक्रार करूनही दुर्लक्ष केले जात आहे.

हे पाणी रस्त्यावर, दोन ते तीन किलोमीटरपर्यंत रोज वाहत असते. याची प्रचंड दुर्गंधी परिसरात पसरलेली आहे. येथील नागरिकांनी याबाबत अनेक वेळा महापालिकेकडे तक्रारी करुनही ही समस्या सुटत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

बातम्या आणखी आहेत...