आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामांचा आढावा:रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे पूर्ण करावीत; माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या सूचना

येवला23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अतिवृष्टीमुळे रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झालेली आहे. आता पाऊस थांबल्याने कामाला गती देऊन तातडीने महामार्ग तसेच येवला मतदारसंघातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशा सूचना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.येथील संपर्क कार्यालयात आज विविध विकासकामांबाबत आढावा बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, येवला शहरात अतिवृष्टी झाल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे नागरिकांच्या दुकानांमध्ये व घरात पाणी शिरले. बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

यापुढे असा प्रसंग निर्माण होणार नाही यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना देऊन नैसर्गिक नाले पूर्ववत करावे. तसेच शासनाकडून नुकसानग्रस्तांना मदत मिळण्यासाठी प्रस्तावाची माहिती घेऊन त्यांनी विविध सूचना दिल्या.ते म्हणाले की, अतिवृष्टीमुळे रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झालेली आहे. आता पाऊस थांबला असून तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी.

येवला शहरातील बाजारपेठेत विक्रेत्यांना आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्यात याव्यात. साप्ताहिक बाजाराच्या वेळी योग्य नियोजन करून वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. तहसीलदार प्रमोद हिले, गटविकास अधिकारी अन्सार शेख, उपकार्यकारी अभियंता सागर चौधरी, उपअभियंता उन्मेष पाटील, जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता कुलकर्णी उपस्थित हाेते.

बातम्या आणखी आहेत...