आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाचशेहून अधिक गरजू महिलांना शिवणकाम तसेच सौंदर्यशास्त्र विषयक मोफत प्रशिक्षण देऊन त्यांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. क्लबने दत्तक घेतलेले मोडाळे गाव आदर्श बनविण्यासाेबतच दृष्टिहिन बांधवांना सुरक्षारक्षक केबिन बांधून देण्याचा संकल्प रोटरी क्लब नाइन हिल्सचे नूतन अध्यक्ष धनंजय बेळे आणि त्यांच्या टीमने केला. रोटरी क्लब नाइन हिल्सचे नूतन अध्यक्ष धनंजय बेळे आणि त्यांच्या टीमचा पदग्रहण सोहळा छत्रपती संभाजीराजे भोसले आणि जिंदाल सॉ लिमिटेडचे अध्यक्ष, व्ही.चंद्रशेखरन यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. त्यावेळी हा संकल्प करण्यात आला व्यासपीठावर मावळत्या अध्यक्ष कल्पना शिंपी, नमिता चिटणीस, वैभव चावक, हेमंत खोंड आदी होते.
नाशिक-रोटरी ही हाय फंडा आहे असे लोकांना वाटते. त्यामुळे ही संकल्पना बदलून रोटरीने सर्वसामान्यांशी असलेली नाळ कशी अधिक घट्ट करता येईल याकडे विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केले. नाशिकमध्ये सर्वाधिक गडकोट-किल्ले आहेत त्याचे संवर्धन होणे गरजेचे आहे रोटरी हे गडकोट-किल्ले दत्तक घेऊन त्याचे संवर्धन करू शकते, यासाठी राेटरीसह विविध संस्थांनी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले. बेळे यांच्याबरोबर त्यांच्या टीमचा शपथविधी पार पडला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.