आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबेकायदेशीर ड्रायव्हिंग स्कुल चालविणाऱ्या इसमाच्या विरोधात आरटीओने कारवाई केली. आरटीओच्या पथकाने वाहन जप्त केले असून संशयित स्कुल चालकाच्या विरोधात मोटार वाहन कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात आली असून 25 हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
प्रादेशिक परिवहन विभागाकडून ड्रायव्हिंग स्कूलला अधिकृत परवानगी दिली जाते. अधिकृत ड्रायव्हिंग स्कूलच्या माध्यमातून चालकांना तंत्रशुद्ध व शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाते. अशाच प्रकारे नाशिकरोड जेलरोड येथे बेकायदेशीर ड्रायव्हिंग स्कूल सुरू करत चालकांना अनाधिकृत प्रशिक्षण देत असल्याची तक्रार ड्रायव्हिंग स्कुल असोसिएशनचे अध्यक्ष सुधाकर जाधव यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी वासुदेव भगत यांच्याकडे केली.
भगत यांनी या तक्रारीची गंभीर दखल घेत सहायक मोटर वाहन निरीक्षक मनीषा चौधरी , अब्बास देसाई व नितीन आहेर या अधिकाऱ्यांना कारवाईच्या सुचना दिल्या. पथकाने संशयित संचालक मनोज सिताराम भंडारी, रा नाशिकरोड, जेलरोड याच्या विरोधात बेकायदेशररित्या ड्रायव्हिंग स्कूल सुरू केल्याच्या विरोधात मोटार वाहन कायद्या अंतर्गत कारवाई केली. चालकांना प्रशिक्षण देणारे वाहन एमएच ०४ डीडी ३००२ जप्त करण्यात आले.
संशयित भंडारी हे ४ ते ५ वर्षापासून अनाधिकृत ड्रायव्हिंग स्कुल च्या माध्यमातून वाहनावर नाव न टाकता चालकांना प्रशिक्षण देत होते. आजपर्यंत ७०० च्या वर चालकांना प्रशिक्षण दिल्याची माहिती समोर आली आहे. संशयित अधिकृत ड्रायव्हिंग स्कूलच्या माध्यमातून चालकांना परवाने काढून देत होता.
वाहन चालकांनी अधिकृत मोटार ड्रायव्हिंग स्कुलकडून प्रशिक्षण घ्यावे. अनाधिकृत ड्रायव्हिंग स्कुलवर कारवाई करण्यात आली आहे. शहरातत बोगस स्कुल असल्याच्या तक्रारी आहेत. आरटीओकडून तपासणी मोहीम राबवली जाणार आहे.
- वासुदेव भगत, उपप्रादेशिक अधिकारी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.