आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राधिकरण ताब्यात:रुबाब अधिकाऱ्याचा निघाला दलाल प्राधिकरणच घेतले ताब्यात; शिपाई, वरिष्ठ अधिकारीही दिमतीला

सचिन वाघ|नाशिकरोड16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक महानगराप्रमाणेच लागून असलेल्या परिसराचा विकास होण्यासाठी राज्य शासनाने १ मार्च २०१७ मध्ये नाशिक महानगर विकास प्राधिकरणाची स्थापना केली. ६ वर्षे उलटली तरी अद्यापही प्राधिकरणाची समिती गठित करण्यात आली नसल्याने एका सुटाबुटात फिरणाऱ्या दलालाने प्राधिकरण ताब्यात घेतले आहे. त्याच्या दिमतीला कार्यालयातील शिपायापासून ते वरिष्ठ अधिकारीही आहेत हे विशेष.

नाशिक प्रदेश विकास प्राधिकरण स्थापन करण्यात आले. प्राधिकरणातर्गंत नाशिक महापालिका क्षेत्र वगळून दिंडोरी, निफाड, सिन्नर, इगतपुरी, नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. सहाही तालुक्यांतून विकसकांना आपल्या प्रकल्पासाठी प्राधिकरणातून परवानगी घ्यावी लागते, मात्र या परवानगीसाठी दलालाचा हिरवा कंदील असल्याशिवाय फाइल पुढे सरकत नसल्याची चर्चा आहे. प्राधिकरण कार्यालयात माहितीसाठी आलेल्या सर्वसामान्य नागरिकांसाठी उपसंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे वेळ नाही हे नागरिक वारंवार भेटण्यासाठी गेल्यानंतर दिसून आले आहे. या प्रकारामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये अधिकाऱ्यांविषयी तीव्र संताप निर्माण झालेला आहे.

समितीच गठित नसल्याने एकूणच विकास खुंटला
नाशिक प्राधिकरणांतर्गत विकास साधण्यासाठी स्वंतत्र समिती गठित करावी लागते, मात्र सहा वर्षांपासून समितीच गठित झाली नसल्याने आतापर्यंत प्राधिकरणाच्या क्षेत्रात कोणताही रस्ता, पूल, मोठा प्रकल्प सुरू होत नाही.

प्रकरणाची गंभीर दखल
नाशिक प्राधिकरणातील या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. अधिकारी व कर्मचारी दोषी आढळल्यास कारवाई हाेईल.
राधाकृष्ण गमे, विभागीय महसूल आयुक्त

बातम्या आणखी आहेत...