आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

32 वर्षांपूर्वीच्या नियमाची आडकाठी:सिटी लिंकच्या कसारापर्यंतच्या‎ विस्ताराला नियमांचा अडथळा

नाशिक‎13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

८ जुलैपासून नाशिक शहरात सुरू केलेल्या‎ सिटी लिंक बससेवेचा ताेटा काही केल्या‎ कमी हाेत असून उत्पन्नवाढीसाठी ग्रामीण‎ भागातील नफ्याचे मार्ग ताब्यात घेण्याची‎ सिटी लिंक व्यवस्थापनाची धडपडही‎ थांबण्याची चिन्हे आहेत. १९९१ मध्ये मनपा‎ हद्दीबाहेर जास्तीत जास्त २० किमी‎ अंतरापर्यंत शहर बससेवेचा विस्तार नियम‎ असल्यामुळे आता महामार्ग‎ बसस्थानकापासून ६० किमी अंतरावर‎ असलेल्या कसाऱ्यापर्यंतच्या विस्ताराच्या‎ आशा मावळल्या आहेत. याबराेबरच‎ पिंपळगाव ते निफाड हा विस्तारही अशक्य‎ असून राज्यभरातून असे प्रस्ताव येत‎ असल्यामुळे नाशिकसाठी एखादा निर्णय‎ झाला तर ताे राज्यासाठी लागू करण्याची वेळ‎ येणार असल्यामुळे सारेच अधांतरीच‎ असल्याचे सीटी लिंकमधील उच्चपदस्थांचे‎ म्हणणे आहे.‎ तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस‎ यांचा ड्रीम प्राेजेक्ट म्हणून राज्य परिवहन‎ महामंडळाची ताेट्यातील शहर बससेवा‎ नाशिक महापालिकेच्या माथी मारली गेली.‎

गेल्या दीड वर्षात ताेट्याचे आकडे तीस‎‎‎‎‎ काेटींहून अधिक आहेत. सध्यस्थितीत २४०‎ बसेस सुरू असल्यामुळे ताेट्याचे आकडे‎ नेमके किती हेही गुलदस्त्यात आहे. ताेटा‎ कमी करण्यासाठी सिटी लिंकच्या वतीने‎ दिंडोरी, पिंपळगाव - बसवंत, ओझर,‎ त्र्यंबकेश्वर, वाडीवऱ्हे, चांदोरीपर्यंत बससेवा‎ सुरू करण्यात आली. तत्कालीन आयुक्त‎ कैलास जाधव यांनी ताेटा कमी करण्यासाठी‎ ठाणे जिल्ह्यातील कसारा लोकलला कनेक्ट‎ बससेवेसाठी प्रयत्न सुरू केले.

सिटी लिंकने‎ तसे परवानगीचे पत्र महामंडळाकडे दिले‎ आहे. मात्र, त्यावर निर्णयच झाला नाही.‎ नियमानुसार शहरी हद्दीपासून २० किमीपेक्षा‎ बाहेर विस्तारास परवानगी नाही. त्यामुळे मार्ग‎ काढण्यासाठी नाशिक महापालिका हद्दीतील‎ विल्हाेळीपासून ते कसारा रेल्वे‎ स्थानकापर्यंतच्या पन्नास किलोमीटर‎ प्रवासाला तरी मान्यता द्यावी अशी विशेष‎ मागणी केली गेली. मात्र हा‎ राज्यपातळीवरील धाेरणात्मक निर्णय‎ असल्याने कसारापर्यंत सिटी लिंकवर‎ सध्यातरी फुली आहे.‎

एसटीकडून पालिकेची काेंडी‎
पूर्वी ५ काेटींचा ताेटा हाेता म्हणून शहरी‎ बससेवा पालिकेने चालवावी असा‎ आग्रह राज्य परिवहन महामंडळ करीत‎ हाेता. मात्र, आता हात दगडाखालून‎ निघाल्यानंतर नाशिक महापालिकेला‎ ठेंगा दाखवला जात आहे. निमाणीपाेटी‎ प्रतिमाह १० लाख याप्रमाणे वार्षिक एक‎ काेटी २० लाख तर भगूर व नाशिकराेड‎ मिळून वार्षिक ५० लाख भाडे‎ मिळण्याच्या मागणीवर परिवहन‎ महामंडळ ठाम आहे.‎

निर्णय राज्यासाठीच हाेतील‎
कसारापर्यंत तसेच‎निफाडपर्यंत सिटी‎लिंक विस्तारासाठी‎राज्य परिवहन‎महामंडळाकडे‎पाठपुरावा सुरू‎ आहे. मात्र, असे निर्णय संपूर्ण‎ राज्यासाठी एकाचवेळी धाेरणात्मक‎ म्हणून हाेण्याची शक्यता अधिक आहे.‎ १९९१ मधील निर्णयानुसार शहराबाहेर‎ २० किमीपर्यंतच बसेसची सुविधा‎ पुरवण्यास मुभा आहे.- मिलिंद बंड,‎ व्यवस्थापक, सिटी लिंक‎

बातम्या आणखी आहेत...