आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात घडल्यास तुम्हाला येईल काॅल:अपघातग्रस्तांसाठी आता 'साथी'ची लाखमोलाची साथ; नाशिकमधल्या तरुणाने साकारले अ‍ॅप

नाशिक15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाहनांच्या वाढत्या संख्येबरोबर अपघाताचीही संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. अनेकदा अपघातग्रस्तांना वेळीच मदत मिळू न शकल्याने त्यांना आपला जीव गमवावा लागतो. याच पार्श्वभुमीवर शहरातील तरुणाने अंत्यत उपयुक्त असे साथी अ‌ॅप साकारले असून अपघात घडल्यास या अ‌ॅपद्वारे संबधित व्यक्तींच्या नातेवाईकांना तातडीने संपर्क करण्यास मदत होणार आहे.यामुळे अपघात ग्रस्तांना वेळीच वैद्यकीय मदत मिळणार आहे.

नाशिकच्या तरुणाने साकारले अ‍ॅप

अपघात झाल्यानंतर संबधितांना तातडीने वैद्यकीय उपचार मिळणे गरजेचे असते. मात्र अनेकदा अपघातग्रस्तांना मदत मिळत नाही किंवा मदत मिळण्यास उशिर होतो.यामुळे तत्रज्ञानाची सांगड घातल मयूर जसनानी या युवकाने हे साथी अ‍ॅपच्या माध्यमातून स्टार्टप सुरु केले आहे. वाढते अपघात बघता ऐनवेळी कुणाला संपर्क करावा यासाठी सरकारी यंत्रणांना धावपळ करावी लागते. अपघातग्रस्त व्यक्तीच्या नातेवाईकांची शोधाशोध करावी लागते. यासाठी बराच वेळ खर्ची पडतो. परिणामी उपचारास उशीर होतो आणि व्यक्ती जीवास मुकते. त्यासाठी हा क्यूआर कोड आणि साथी ॲप अतिशय महत्त्वाचा दुवा ठरणार आहे.

असे चालते क्युआर काेडचे काम

एक क्यूआर कोड दूचाकी किंवा चारचाकी वाहनावर लावून हे ॲप आपल्या मोबाईल मध्ये इंस्टॉल करायचे असते. ॲप नसले तरी गुगल लेन्स कॅमेरा ने ही हा कोड स्कॅन करता येतो. यामध्ये आपल्या घरचा, जवळचे नातेवाईक, मित्र, शेजारी असे कोणतेही चार संपर्क नंबर सेव्ह करण्याची सोय आहे. गाडीचा अपघात झाल्यानंतर हा कोड स्कॅन केल्यावर या पैकी जो नंबर निवडला जाईल त्यावर ऑटो कॉल जाईल आणि अपघातग्रस्त व्यक्तीची माहिती त्याच्या नातेवाईकांपर्यंत वेळेत पोहचू शकेल. परिणामी मित्र नातेवाईक घटनेची दखल घेवून वेळेत हॉस्पीटल अथवा अपघातस्थळी पोहचून आपल्या जवळच्या व्यक्तीचे प्राण वाचवू शकतील.

बातम्या आणखी आहेत...