आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासद्गुरू सदाफलदेव १००१ कुंडीय विश्वशांती वैदिक महायज्ञ आणि विहंगम योग संतसमागम या आध्यात्मिक सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. या सोहळ्यासाठी सिंगापूर, साऊथ आफ्रिका, नायजेरिया, आॅस्ट्रेलिया, अमेरिका यासारख्या सात देशांसह महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात राज्यातून १० हजार साधक सहभागी हाेणार आहेत. शनिवारी (दि. ४) विहंगम योग संतसमागम आणि रविवारी (दि. ५ ) विश्वशांती वैदिक महायज्ञ त्र्यंबकरोड जवळील ठक्कर डोम येथे हाेणार आहे. शनिवारी सायंकाळी ५.३० वाजता ''अ'' अंकित श्वेत ध्वजारोहण समारंभ पार पडेल.
यानंतर श्री. संत प्रवर श्री विज्ञानदेवजी महाराज यांचा ‘स्वर्वेद कथामृत’ हा दिव्यवाणी कार्यक्रम होईल. सद्गुरू आचार्य श्री.स्वतंत्रदेवजी महाराज यांची अमृतवाणी भाविकांना श्रवण करता येणार आहे. यानंतर महाप्रसादाने पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमाचा समारोप होईल. रविवारी ५ फेब्रुवारी राेजी सकाळी ९ वाजता ''अ'' अंकित श्वेत ध्वजारोहण होईल. यानंतर सकाळी ९.३० वाजेपासून १००१ कुंडीय विश्वशांती वैदिक महायज्ञ व महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडणार आहे. जास्तीतजास्त नाशिककरांनी कार्यक्रमात सहभगाी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
साधकांचा शहरात दोन दिवस मुक्काम
देश-विदेशातून किमान १० हजार साधक या सत्संगासाठी उपस्थित राहणार असून त्यांच्याकरिता शहरातील बहुतांश हाॅटेल्स मधील एक हजार रुम्स बुक करण्यात आल्या आहेत. यातून शहरात किमान लाखाे रुपयांची उलाढाल हाेणार आहे. विशेष म्हणजे, येणारा साधक दाेन दिवस नाशिकमध्ये राहणार आहे.
हवनासाठी ८ हजार भाविकांची साेय
१००१ कुंडीय विश्व शाती वैदिक महायज्ञ या कार्यक्रमाचे वैशिष्टय आहे. प्रत्येक हवनासाठी चार जाेडपे सहभागी हाेणार आहे, किमान ८ हजार भाविक येथे हवनासाठी बसू शकतील. या धार्मिक समारोहासाठी राज्य व देशभरातून भाविक दाखल होणार असल्याचे आयाेजकांनी कळविले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.