आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Sadhu Mahanta's Protest In Nashik Against 'Annis' Mahanta Alleges That The Purpose Of The Abolition Of Superstition Act Has Gone Astray.

'अंनिस'च्या विरोधात नाशिकमध्ये साधु महंताचे आंदोलन:अंधश्रध्दा निर्मुलन कायद्याचा उद्देश भरकटला असल्याचा महंताचा आरोप

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बागेश्वर धाम वरुन देशभरात साधु महंत एकत्रित येवून अनिसच्या विरोधात आंदोलन करीत आहे. अंधश्रध्दा निर्मुलन कायद्याचा उद्देश भरकटला असल्याने या विरोधात सोमवारी नाशिकमध्ये महंत अनिकेत शास्त्री यांच्या पुढाकाराने गोदावरी तिरी साधु महंतांनी एकत्रित येवून अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या कामाच्या पध्दतीविरोधात आवाज उठविला आहे.

नाशिक येथे सोमवारी गोदावरी तिरी महंत अनिकेतशास्त्री, महंत सुधीरदास पुजारी, महंत हर्षदभारती महाराज, महंत नाथानंद महाराज, महंत पूर्णानंद महाराज, मंहत योगीश्वर महाराज, पंडित सतिश शुक्ल, पंडित नागेशशास्त्री देशपांडे महाराज, पंडित दिपेशशास्त्री महाराज यांच्यासह आदीच्या उपस्थितीमध्ये अंधश्रध्दा निर्मुलन समिती च्या विरोधात आक्रमक होत संताप व्यक्त करण्यात आला. अनिस फक्त हिंदु धर्माविरोधात आवाज उठवित असल्याचा आरोप साधु हे आक्रमक झाले होते.

ज्या प्रमाणे हिंदुच्या चमत्कारविरोधात आवाज उठविला जातो, त्याच प्रमाणे इतर धर्मात ही असे चमत्कार केले जातात. त्याविरोधात अनिस आवाज उठवित नाही. जादु टोणाविरोधी कायद रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे.अन्य धर्मीय हे कँन्सर, किडनीसह अनेक आजार बरे करण्याचे दावे करतात, त्यापैकी कोणीही येवून जर सिध्द केले तर महर्षि आध्यात्मिक प्रतिष्ठान व सर्व संत महंत आचार्य यांच्या वतीने ५१ लाखांचे बक्षिस नाशिक येथील महंत अनिकेत शास्त्री देशपांडे यांनी जाहिर केले आहे.

तसेच शासनाने लागु केलेल्या या कायद्याचा उद्देश भरकटला असल्याचे आरोप महंतांनी यावेळी केला. तसेच फक्त हिंदुना आणि हिंदु धर्मगुरूंना निशाणा केला जात असल्याचा आरोपही यावेळी केला.

महंत अनिकेत शास्त्री देशपांडे म्हणाले की,राजा असो की रंक असो या सर्वांना धर्मगुरु हे कल्याण होण्याचा आर्शिवाद देत असतात. यामध्ये ज्याचे कल्याण होते, तो सांगतो की आमचे कल्याण झाले.तसेच दाभोळकर आणि त्यांचे अनुयायी यांच्यात मोठा फरक दिसत आहे. अनिसच्या माध्यमातुन फक्त हिंदु धर्मांला निशाणा केले जात आहे -

बातम्या आणखी आहेत...