आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मंदिरे उघडण्याची मागणी:शरद पवार हेच उद्धव ठाकरे यांचे विठ्ठल आणि सिल्व्हर ओक हीच त्यांची पंढरी; साधू, महंतांची मुख्यमंत्र्यांवर टीका

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मशिदी उघडणार म्हणण्याची जलील यांची हिंमत कशी होते? नाशिकच्या साधू-महंतांचा सवाल

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये सर्वच धार्मिक स्थळे बंद आहेत. मात्र, 29 ऑगस्टपर्यंत मंदिरे उघडावीत अशी मागणी साधू, महंतांनी केली आहे. तसेच मंदिरे न उघडल्यास राज्यव्यापी घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा राज्य सरकारला दिला आहे. यावेळी साधू महंतांच्या प्रतिनिधींनी एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार इम्तियाज जलील यांच्यावरही टीका केली. मशिदी उघडणार असं म्हणण्याची जलील यांची हिंमत कशी होते, असा सवाल या साधू महंतांनी केला आहे. नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. साधू, महंतांच्यावतीने अध्यात्मिक समनव्य आघाडीचे समन्वय आचार्य तुषार भोसले यांनी भूमिका मांडली.

शरद पवार हेच उद्धव ठाकरे यांचे विठ्ठल आहेत आणि सिल्व्हर ओक हीच त्यांची पंढरी आहे, असे म्हणत अध्यात्मिक समन्वय आघाडीने मुख्यमंत्र्यांवर टीका केली. राज्यात मदिरा सुरु आहे, पण मंदिरे मात्र बंदच आहेत, असे मत साधू महंतांनी मांडले. तसेच ‘दार उघड, उद्धवा दार उघड’ अशी हाकही यावेळी देण्यात आली. विरोधी पक्ष भाजपचाही या घंटानाद आंदोलनाला पाठिंबा आहे. आमच्या मागण्या मान्य न झाल्यास गणेश विसर्जनानंतर आंदोलनाची पुढची दिशा ठरवू, असे तुषार भोसले यांनी सांगितले आहे.

दरम्यान मशिदी उघडणार असं म्हणण्याची खासदार इम्तियाज जलील यांची हिंमत कशी होते, असा सवालही या साधू महंतांनी उपस्थि केला. एमआयएम आणि सरकारची मिलीभगत असल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आला.

काय म्हणाले होतो जलील?

दरम्यान, राज्य सरकारने एक सप्टेंबरपासून मंदिरे उघडावीत, आम्ही दोन तारखेला सर्व मशिदी उघडू, असा इशारा देत एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी सरकारला अल्टिमेटम दिला आहे. त्यांनी ट्विटरवरुन ठाकरे सरकारला हा इशारा दिला.