आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासात महिन्यात पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अशाेक आत्राम यांची उचलबांगडी झाल्यानंतरही त्यांना खुर्चीचा माेह कायम असल्याचे साेमवारी बघायला मिळाले. त्यांच्या जागी नियुक्त झालेल्या शिर्डी संस्थानच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानाईतकर यांनी दुपार पदभार स्वीकारून कामकाजासाठी मार्गस्थ झाल्यानंतर त्यांच्या खुर्चीत बसून आत्राम अधिकाऱ्यांशी चर्चा करीत फाईलींचा निपटारा करताना दिसत हाेते.
अजब उत्तर
यासंदर्भात आत्राम यांना विचारले असता, त्यांनी नागरिकांच्या तक्रारी निवारण करण्यासाठी फाईली बघत असून काेणतेही निर्णय घेत नसल्याचे अजब उत्तर दिले. आत्राम यांची महापालिकेत अवघ्या सात महिन्यांची उणीपुरी कारकिर्द चर्चत राहीली. २३ मे २०२२ राेजी त्यांनी अतिरिक्त आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला हाेता.
पालिकेत अतिरिक्त आयुक्तांची दाेन पदे असून त्यापैकी एका पदावर सुरेश खाडे हे अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत हाेते. नियुक्तीपासूनच आत्राम यांच्याभाेवती वादाचे वलय राहीले. त्यांनी खातेप्रमुखांना पत्र पाठवून फाईलींचा प्रवास आपल्यामार्फत व्हावा असे दंडक घातले हाेते. वाढत्या तक्रारी लक्षात घेत आयुक्त डाॅ चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आत्राम यांच्याकडे महत्वाची जबाबदारी देणे टाळले हाेते.
दरम्यान, पालिकेतील काही नाराज लाेकप्रतिनिधींनी थेट शासनाकडेच बदलीसाठी पाठपुरावा सुरू केला हाेता. त्याची गंभीर दखल घेत गेल्याच आठवड्यात आत्राम यांची बदली करण्यात आली. त्यांच्या जागी बानाईतकर यांची नियुक्ती झाली. शनिवार व रविवार हा सुट्टीचा दिवस असल्यामुळे बानाईतकर यांनी साेमवारी दुपारी पदभार घेण्यासाठी आल्या. आयुक्त डाॅ पुलकुंडवार हे रजेवर असल्यामुळे त्यांनी पदभार स्वीकारण्याची प्रक्रिया पुर्ण केली. पदभार घेतल्यानंतर त्या पुढील कामकाजासाठी मार्गस्थ झाल्या मात्र त्यानंतर आत्राम यांनी अतिरिक्त आयुक्तांच्या खुर्चीत बसूनच पुढील कामकाज सुरू ठेवले.
काही नागरिकांच्या तक्रारीचा संदर्भ देत त्यांनी अधिकाऱ्यांना बाेलवले मात्र संकेताला धरून नसतानाही केवळ वरिष्ठांचा राेष नकाे म्हणून अधिकारी फाईलीवर चर्चा करताना दिसत हाेते.
ठेकेदाराशी गुफ्तगूमुळे नाेटीस
मध्यंतरी पेस्ट कंट्राेलच्या वादग्रस्त ठेक्याशीसंबंधित एका ठेकेदारासाेबत शासकीय विश्रामगृहावर त्यांची फाईलीसह गुप्तगू हाेत असल्याचे प्रकरण चर्चत आले. याप्रकरणी आयुक्तांनी त्यांना नाेटीस काढून थेट शासनाकडेही अहवाल दिला हाेता.
प्रश्न साेडवण्यासाठी कामकाज
माझ्या क्षमतेचा पुर्ण वापर झाला नाही. पदभार साेडल्यानंतरही नागरिकांचे प्रश्न साेडवण्यासाठी कामकाज करीत आहे. त्यात पालिका वा शासनाचे काेणतेही नुकसान नाही. - अशाेक आत्राम, माजी अतिरिक्त आयुक्त
पदभार घेतला ; सध्या नाे काॅमेटस
''मी पदभार घेतला आहे. मात्र सध्या याप्रकरणी मी काहीही बाेलू इच्छित नाही. माझी प्रतिक्रीया इतकीच की नाे काॅमेटस.'' - भाग्यश्री बानाईतकर, अतिरिक्त आयुक्त.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.