आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहतूक:साईनाथनगर चौफुली; वाहतूक कोंडीचे केंद्र

नाशिक17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

साईनाथनगर चौफुलीलगत रस्त्याच्या दुतर्फा अनधिकृत वाहनतळ निर्माण झाले आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन वाहनधारकांना मार्गक्रमण करणे जिकिरीचे झाले आहे. हा रस्ता वाहतुकीसाठी की वाहन पार्किंगसाठी असा प्रश्न केला जात Eहे. सुमारे पंधरा वर्षांपूर्वी पावसाच्या पाण्यासाठी पडून असलेल्या पाटाचा दुरुपयोग होत असल्याने त्या ठिकाणी मनपाने जॉगिंग ट्रॅक तयार केला. साईनाथनगर चौफुली ते डीजीपीनगर एकपर्यंत जॉगिंग ट्रॅक आहे. जॉगिंग ट्रॅकवर नेहमीच वर्दळ असते.

सदर रस्ता डीजीपीनगर क्रमांक एक, वडाळागाव चौफुली, साईनाथनगर चौफुली, इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकमार्गे मुंबई-पुणे महामार्गाला जोडला जातो. त्यामुळे दिवसभर वाहनांची वर्दळ सुरू असते. साईनाथनगर चौफुलीलगत सुमारे एक महिन्यापूर्वी मॉल झाला आहे. या ठिकाणी येणारे ग्राहक आपली वाहने रस्त्याच्या दुतर्फा लावतात. तसेच याच रस्त्यावर ऑनलाइन परीक्षा केंद्र असल्याने जेव्हा परीक्षा असते त्या दिव‍शी त्या ठिकाणी जिल्ह्यातून विद्यार्थी येतात. त्यांची वाहनेही बाहेर उभी केली जातात, त्यामुळे वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. या भागात लहान-मोठ्या अपघातांचे प्रमाण वाढल्याने वाहतूक विभागाने रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...