आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंत निवृत्तीनाथ पालखीचा मान नामदेव शिंपी पंच मंडळाचा आहे. तो पंचायत समीतीला देऊ नये अशी मागणी पंच मंडळाने नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. आता ते काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नेमके प्रकरण काय?
संत निवृत्तीनाथ महाराज पालखिचे नाशिकमध्ये मंगळवारी आगमन होत आहे. गेली 2 वर्षे कोरोनामुळे वारीला परवानगी देण्यात आली नव्हती. मात्र यंदा वारीला परवानगी देण्यात आल्यानंतर त्यांचा मान हा संत नामदेव विठ्ठल मंदिर, पंच मंडळाचा असतो, यंदा मात्र त्यांना डावलण्यात आले आहे. त्यामुळे हा मान पंचमंडळाचाच असून तो आम्हालाच मिळावा अन्यथा परंपरेला खीळ बसेल अशा विनंतीचे निवेदन पंच मंडळाने नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. त्यावर आता जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.
150 वर्षांची परंपरा
आषाढी वारीसाठी संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी त्र्यंबकेश्वर दरवर्षी प्रस्थान ठेवते, 14 जुन रोजी या पालखीचे नाशिकमध्ये आगमन होणार आहे. अनेक वर्षांपासून या पालखी सोहळ्याचा मान 150 वर्षे पुरातन असे श्री संत नामदेव विठ्ठल मंदिर, नाशिक शहर पंच मंडळाचा असतो. तर ही पालखी संत नामदेव विठ्ठल मंदिर, काजीपुरा, जुने नाशिक येथे मुक्कामास असते.
पंचायत समीतीला स्वागताचा मान
मात्र यंदा पालखी स्वागाताचा मान पंचायत समितीलाच देण्यात आल्याने भाविकांमध्ये नाराजी परसली आहे. त्यामुळे मागील परंपरा खंडीत न करता यावर्षी देखील हा मान नाशिक शहर नामदेव शिंपी पंच मंडळासच मिळावा. अशी मागणी त्यांनी केली आहे. श्रद्धेचा आणि विनंतीचा मान ठेवावा अन्यथा परंपरेलाच खीळ बसेल असा इशारा या निवेदनाद्वारे पंच मंडळाचे अध्यक्ष अरुण नेवासकर, राजेंद्र करमासे, प्राचार्य डॉ. के. आर. शिंपी, अतुल मानकर, संजीव तुपसारखे, त्र्यंबक काळे यांनी दिला आहे. यावेळी नामदेव शिंपी समाजातिल विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.