आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक:संत निवृत्तिनाथांची पालखी त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरला जाण्यासाठी सज्ज; आज होणार रवाना

नाशिक24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांची पालखी पंढरपूरच्या विठुरायाच्या भेटीसाठी साेमवारी (दि.१३) त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार आहे. या पालखीचे पावित्र्य लक्षात घेता पालखी मार्गावरील उघड्यावरील मांस विक्रीची दुकाने प्रशासनाने बंद ठेवावीत, अशी मागणी निवृत्तिनाथ महाराज मंदिराचे पुजारी जयंत गोसावी व सामाजिक कार्यकर्ते शांताराम चव्हाण यांनी केली आहे.

दरवर्षी आषाढी एकादशीकरता राज्याच्या विविध भागांतून संतांच्या पालख्या पंढरपूरला जातात. या सर्व पालख्यांची शासन दरबारी नोंद करण्यात आलेली आहे. त्र्यंबकेश्वर येथून संत निवृत्तिनाथ महाराजांची मानाची पालखी सोमवारी निघणार आहे. वारीचा २७ दिवसांचा पायी प्रवास असून पंढरपूर येथे पाेहोचल्यानंतर ५ दिवस पालखी पंढरपुरात मुक्कामी असताे. त्यानंतर पौर्णिमेला त्र्यंबकेश्वरच्या दिशेने परतीचा प्रवास सुरू हाेताे. १८ दिवसांनी पालखी त्र्यंबकेश्वरला पाेहाेचते. आषाढी वारी निघाल्यानंतर वारीत ठिकठिकाणाहून ४६ दिंड्यांच्या माध्यमातून ७० ते ८० हजार भाविक सहभागी हाेतात. पालखी सोबत सर्व वैद्यकिय सुविधा, पिण्याचे पाणी आणि स्वयंसेवक असणार आहेत.

देहूचे मंदिर भाविकांसाठी पुन्हा खुले; मुखदर्शन घेता येणार : नितीन महाराज
पुणे- देहूतील संत तुकाराम महाराजांचे मंदिर १४ जूनपर्यंत भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय देहू संस्थानने मागे घेतला आहे. केवळ पंतप्रधानांच्या कार्यक्रमादिवशी म्हणजे १४ जूनला सायंकाळी पाचपर्यंत मंदिरात भाविकांना बंदी असेल. त्यामुळे सोमवारी (१३ जून) भाविकांना मंदिराच्या उत्तर दरवाजातून मुखदर्शन घेता येणार आहे, अशी माहिती देहू संस्थानचे विश्वस्त नितीन महाराज मोरे यांनी दिली.

श्री रुक्मिणीच्या पावलांवर लावला लेप; चार ते पाच वर्षे टिकणार
पंढरपूर -श्री रुक्मिणीच्या पावलांची झीज झाली होती, ती भरून काढण्यासाठी भारतीय पुरातत्त्व विभागाच्या पथकाने रविवारी १२ तास काम करून मूर्तीच्या पावलावर इपोक्सी सिलिकॉन लेपन केले आहे. दोन महिन्यांपूर्वी श्री रुक्मिणीच्या पावलांची मोठ्या प्रमाणात झीज झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर तातडीने मंदिर समितीने पत्रान्वये औरंगाबाद येथील भारतीय पुरातत्त्व विभागाला पाचारण करून मूर्तीची पाहणी केली. आणि शनिवारी रात्री उशिरा मूर्तीच्या लेपन प्रक्रियेला सुरुवात केली. रविवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता मूर्तीचे पाय पूर्ववत झाले आहेत. मात्र मूर्ती शाळीग्राम पाषाणाची असून नित्योपचार करीत असताना दूध, दही, पाण्याचा अतिवापर टाळावा अशा सूचना केल्या आहेत. तसेच पुढील दोन दिवस रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन आणि नित्योपचार बंद ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती मंदिर समितीने दिली.

बातम्या आणखी आहेत...