आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संत निवृत्तीनाथांची पालखी:त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरला जाण्यासाठी सोमवारी निघणार; उघड्यावरील मांस विक्री बंद करा - पुजारी

नाशिक20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वारकऱ्यांचे श्रध्दास्थान असलेल्या निवृत्तीनाथ महाराजांची पालखी पंढरपूरच्या विठूरायाच्या भेटीसाठी सोमवारी (दि.13) त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार आहे. या पालखीचे पावित्र्य लक्षात घेता पालखी मार्गावरील उघड्यावरील मांस विक्रीची दुकाने प्रशासानने बंद ठेवावी अशी मागणी निवृत्तीनाथ महाराज मंदिराचे पुजारी जयंत गोसावी व सामाजिक कार्यकर्ते शांताराम चव्हाण यांनी केली आहे.

दरवर्षी आषाढी एकादशी करता राज्याच्या विविध भागांतून संतांच्या पालख्या पंढरपूरला जातात. या सर्व पालख्यांची शासन दरबारी नोंद करण्यात आलेली आहे. त्र्यंबकेश्वर येथून संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी सोमवारी निघणार आहे. वारीचा 27 दिवसांचा पायी प्रवास असून पंढरपूर येथे पोहचल्यानंतर 5 दिवस पालखी वारीचा पंढरपूरलाच मुक्काम असतो. तेथून पौर्णिमेला परत त्र्यंबकेश्वरच्या दिशेने प्रवास सुरु होतो. 18 दिवसांनी पालखी त्र्यंबकेश्वरला पोहचते. आषाढर वारी निघाल्यानंतर वारीत ठिकठिकाणाहून 46 दिंड्यांच्या माध्यमातून 70 ते 80 हजार भाविक सहभागी होतात. आषाढी वारीच्या या काळात पालखी मार्गवर रस्त्यावरच उघड्यावर मांस विक्री सुरू असते. त्यामुळे वारीतील भाविकांच्या भावना दुखावल्या जात असल्याने वारी मार्गावरील उघड्यावरील मांस विक्री करणारी दुकाने बंद ठेवण्याची मागणी मंदिराचे पुजारी जयंत गोसावी व वासाळी येथील वारकरी सांप्रदायाचे सामाजिक कार्यकर्ते शांताराम चव्हाण यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...