आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लिलाव:थकबाकीमुळे जिल्हा बँकेकडून 19 ट्रॅक्टरची विक्री ; नोटाबंदीनंतर झाली बिकट अवस्था

बोरगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची नोटाबंदीनंतरची अवस्था बिकट झाली आहे. यामुळे जिल्हा बँकेने थकबाकी वसुलीसाठी अनेक प्रयत्न केले. यानंतर सुरगाणा तालुक्यातील चार शाखांमधून वितरीत करण्यात आलेल्या कर्जाची थकबाकी १२ कोटी २६ लाख रुपये आहे. याचबराेबर तालुक्यात कर्जरुपात वितरित करण्यात आलेल्या ९२ ट्रॅक्टरपैकी फक्त १९ ट्रॅक्टर जप्त करण्यात आले असून त्यांचा लिलाव करण्यात आला आहे.

नोटबंदीनंतर आणि कर्ज थकबाकीमुळे परिस्थिती बदलली. सद्यस्थितीत कर्जवसुलीचे काम सुरू आहे. सद्यस्थितीत २३ कर्मचारी कार्यरत असून कर्जवाटप केलेल्या सभासदांच्या दारी जात कर्जभरणा करण्याचे आवाहन केले जात आहे. ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंतची जुनी थकबाकी १२ कोटी २६ लाख रुपये आहे. यात ९२ ट्रॅक्टर असून पूर्ण थकबाकीत आहेत. १९ ट्रॅक्टर जप्त करण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...