आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विरोध:मोदी-शहांकडून देशाची विक्री; अंबानी, अदानी यांच्याकडून खरेदी : मंत्री बाळासाहेब थोरात

नाशिक रोड18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दिल्लीत लढा देणाऱ्या शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ शेतकरी जनजागृती परिषदेसह ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन

केंद्रात नरेंद्र मोदी सरकार आल्यापासून शेतकरीच नव्हे तर संपूर्ण जनता वेठीस आली आहे. ज्या शेतकऱ्यांसाठी कायदे केले त्यांना विश्वासात घेतले नाही. त्यावर चर्चा केली नाही. ज्यांनी विरोध केला त्या खासदारांना निलंबित करण्यात आले. हे कायदे भांडवलदार यांच्यासाठी उपयोगी असून यामुळे शेतकऱ्यांना कोणताही फायदा होणार नाही. उलट मोदी आणि शहा हे देशाची विक्री करत असून अंबानी आणि अदाणी हे खरेदी करत असल्याने देशाचा बट्ट्याबोळ झाला असल्याचा आरोप राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला.

केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी तीन काळे कायदे आणि प्रीपेड वीज बिल विधेयका विरोधात दिल्ली येथे लढा देत असलेल्या शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ बहुजन शेतकरी संघटना, अखिल भारतीय किसान सभा, किसान काँग्रेस (आय), किसान सभा, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, आम आदमी किसान सेल, राष्ट्रसेवा दल, राष्ट्रवादी शेतकरी संघटना, शेतकरी सेना यांच्या वतीने रविवारी (दि.२९) नाशिक रोड येथे शेतकरी जनजागृती परिषदेसह ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन केले होते. नाशिक रोड ते गोल्फ क्लब मैदानापर्यंत आयोजन करण्यात आले होते. मात्र पोलिसांनी परवानगी दिली नसल्याने ऐनवेळी सर्व शेतकऱ्यांनी नाशिक रोड येथे बाजार समितीच्या आवारात परिषदेचे आयोजन केले. यावेळी बाळासाहेब थोरात म्हणले की, केंद्रामध्ये जेव्हापासून भाजपचे सरकार आले तेव्हापासून रेल्वे, एलआयसी, विमानतळे आणि रिझर्व्ह बँकेचे खासगीकरण सुरू केले असून देशाला फक्त भांडवलदारांच्या ताब्यात देत आहे.

दिल्लीमध्ये हरियाणा, पंजाबसह इतर राज्यांतील शेतकरी आंदोलन करत आहेत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ते समजत नाही. जेव्हा चिमटा बसेल तेव्हा राज्यातील शेतकऱ्यांना समजेल असा चिमटाही घेतला. मोदी सरकारला बाजार समिती नको आहे. त्यामुळे सर्वच बंधनांतून मोकळे करत आहे. मात्र महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. ज्या व्यापाऱ्याने शेतकऱ्यांचे पैसे बुडविले, त्या व्यापाऱ्यांना पाच वर्षे तुरुंगात जावे लागणार आहे. त्यादृष्टीने कायदा तयार करण्यात येत असल्याचे थोरात यांनी सांगितले. पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांप्रमाणे आमच्या लोकांना आता रस्त्यावर उतरण्याची सवय राहिली नाही. आमचे बरोबर चालले आहे. अामच्यात वाद असल्याचे त्यांना वाटत आहे, अशी कानउघाडणीही स्वपक्षीय कार्यकर्त्यांची महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.

अगोदर गोदाम मग साठेबाजी
केंद्राने भांडवलदारांच्या आर्थिक लाभासाठी अगोदर गोदामे तयार केली. त्यानंतर हे काळे कायदे तयार करण्यात आल्याचा आरोप महसूलमंत्री थोरात यांनी केला. मोदी आणि शहा हे शेतकऱ्यांचा आक्रोश समजून घ्यायला तयार नाहीत. त्यामुळे भाजपचा भ्रम तयार झाला आहे. लोक आम्हालाच मत देतात.

साउंड सिस्टिम खराब
परिषदेसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. मंचावर देखील पदाधिकाऱ्यांची गर्दी झाल्याने आवाज येत नव्हता. थोरात यांनी आयोजनकर्ते यांना साउंड सिस्टिम चांगली ठेवण्याचा सल्ला दिला.

कोरोनाचे नियम धाब्यावर
राज्यात पुन्हा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यादृष्टीने केंद्राने राज्य सरकारला सूचना देखील केल्या आहेत. मात्र, राज्य सरकारमधील महसूलमंत्री थोरात उपस्थित असताना कोरोनाचे नियम धाब्यावर बसविण्यात आले होते. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे हे शारीरिक अंतर न पाळता गर्दीमध्ये बसले होते.

बातम्या आणखी आहेत...